शुभमन गिल आणि इशान किशन(फोटो-सोशल मीडिया)
बीसीसीआयने नुकतीच २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी टी20 संघाचा कर्णधार शुभमन गिलला डच्चू देण्यात आला आहे. संघाची घोषणा होण्या आधी अनेक तज्ञांनी गिलला संधी मिळणार नाही असे मत वीळत केले होते. कारण शुभमनगिलचा टी 20 मधील मागील काही सामन्यांच्या फॉर्म पाहता निवड समिति त्याचा विचार करणार नाही असे बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे संघाने शुभमन गिलला टी-२० विश्वचषकासाठी संघातून वगळले आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल सध्या खराब फॉर्ममध्ये असून तो गेल्या दीड वर्षांपासून आणि मागील १८ टी-20 डावांमध्ये एक देखील अर्धशतक झळकवून शकलेला नाही. यामुळेही त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात होती.
इशान किशनने भारतीय टी २० संघात पुनरागमन झाले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये त्याने आपल्या बॅटने धावाच काढल्या नाही तर आपला संघ झारखंडला विजेतपद देखील मिळवून दिले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ च्या जेतेपदाच्या सामन्यात हरियाणाला पराभूत करत झारखंडने पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद जिंकले.
इशान किशनने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने १० सामन्यांमध्ये ५७.१२ च्या सरासरीने ५१७ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने दोन शतके (११३ नाबाद, अंतिम सामन्यात १०१) आणि तीन अर्धशतके देखील झळकवली आहेत. पण त्याचे यश एवढ्यावरच संपत नाही. तर त्याने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक षटकार आणि चौकार मारण्याचा विक्रम देखील रचला आहे. किशनने या स्पर्धेत ३३ षटकार आणि ५१ चौकार लगावले आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष्य वेधून घेतले. त्याचाच फायदा इशान किशनला झाला आणि टी-२० विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच या मेगा स्पर्धेसाठी निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात रिंकू सिंगला यश आले आहे. महत्वाच्या स्पर्धेसाठी रिंकू सिंगला देखील पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा : Ashes series 2025: पॅट कमिन्सने मोडला मिचेल जॉन्सनचा विक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, शिवम दुबे, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रिंकू सिंग.






