
T20 World Cup 2026: Interest in ICC tournaments is decreasing! This former Indian batsman expressed his concern and offered 'this' suggestion.
Robin Uthappa’s statement regarding the ICC tournament : आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) स्पर्धांमध्ये लोकांचा रस कमी होत चालला आहे. तसेच या स्पर्धेमधील चमक कायम ठेवण्यासाठी प्रशासकीय दृष्टिकोनातून बदल आवश्यक असल्याचा सल्ला देखील भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने दिला आहे. सध्याच्या क्रिकेट कॅलेंडरमध्ये १० महिन्यांत तीन विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात आली. आता, पुरुषांचा टी२० विश्वचषक ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ दरम्यान खेळला जाणार आहे. महिला टी२० विश्वचषक नंतर जून-जुलैमध्ये महिला टी२० विश्वचषक होईल. मला वाटते की खेळ प्रशासकीय दृष्टिकोनातून विकसित झाला पाहिजे, असे उथप्पानी एसए२० दरम्यान निवडक पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
हेही वाचा : Jay Shah ने आणखी एकदा जिंकली रोहित शर्माच्या चाहत्यांची मनं! हिटमॅनची रिअॅक्शन पाहण्यासारखी, Video Viral
आयसीसी स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. चाहते आणि प्रेक्षकांसाठी याचे काय मूल्य आहे? प्रामाणिकपणे आणि आदराने सांगायचे तर, त्यांच्याबद्दल काहीही नवीन नाही आणि त्यांची चमक कमी होत चालली आहे. उथप्पा सध्या एसए-२० मध्ये समालोचन करत आहे. त्यांचे असे मत होते की दोन आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी काही अंतर असले पाहिजे. मला वाटते की आयसीसी चॅम्पियनशिपची नवीनता कायम राहिली पाहिजे. हे केवळ खेळाडूंसाठीच नाही तर चाहते आणि प्रेक्षकांसाठी देखील महत्त्वाचे स्पर्धा आहेत. त्यांना काही महत्त्व असले पाहिजे. त्यामध्ये काही बदल व्हायला हवेत. आपण दरवर्षी आयसीसी स्पर्धा आयोजित करू शकत नाही.
हेही वाचा : IPL 2026 : नवा सिझन, नवे ठिकाण! Virat Kohli बंगळुरूमध्ये नाही खेळणार… RCB चा होम वेन्यू बदलणार
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२०२६ च्या सातव्या फेरीत गुरुवारी सरफराज खानने इतिहास रचला आहे.पंजाबसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना सर्फराजने फक्त १५ चेंडूचा सामना करत अर्धशतक झळकावले आहे, लिस्ट ए क्रिकेट इतिहासात त्याच्या आधी कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही.भारताने १३ जुलै १९७४ रोजी हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध पहिला लिस्ट ए सामना खेळला. हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. ५१ वर्षांत कोणत्याही भारतीय फलंदाजाने हा पराक्रम करता आलेला नाही.