
Neither Rohit nor Gill! According to Adam Gilchrist, 'this' player is the best batsman in the world in all three formats
Virat Kohli is the best batsman in the world in all formats: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज शानदार कामगिरी करत आहेत. यामध्ये कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल आणि रिषभ पंत हे सद्या खोऱ्याने धावा काढत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज फलंदाजांच्या कसोटी निवृत्तीनंतर भारताच्या युवा खेळाडूंनी त्यांची कमी भरून काढण्याच्या पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच जागतिक क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज असे फलंदाज आहेत, त्यापैकी कोण एक सर्वश्रेष्ठ आहे हे ठरवणे अवघड होऊन जाते, अशा परिस्थितीमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण आहे. याबाबत खुलासा केला आहे.
गिलख्रिस्टच्या मते सद्याच्या घडीला तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे टीम इंडियाचा विराट कोहली असल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीचे अॅडम गिलख्रिस्टने तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून वर्णन केले आहे. भारत आणि इंग्लंडमधील सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान अॅडम गिलख्रिस्टच्या या विधानाने विराट कोहलीच्या चाहत्यांच्या मनाला स्पर्ध करेल असे विधान केले आहे.
२०२४ मध्ये टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर आणि या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली. परंतु विराट कोहली आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे.
गेल्या १५ वर्षांत विराट कोहलीने भारताकडून खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वात यशस्वी आणि कामगिरी ककेलि आहे. तो एक यशस्वी फलंदाज राहिला आहे. विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक संस्मरणीय सामन्यांमध्ये भारताला एका हाती विजय मिळवून दिला आहे. विराटने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ३० शतकांसह ९,२३० धावा, ३०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१ शतकांसह १४,१८१ धावा आणि १२५ टी-२० सामन्यांमध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतकांसह ४,१८८ धावा फाटकावल्या आहेत.
हेही वाचा : अबब! IPL बनली पैशांची खदान; या वर्षात BCCI ने केली तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई
अॅडम गिलख्रिस्टने विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. जो क्रिकेट जगतात सदया चर्चेचा विषय बनला आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेट आणि टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु, तो अजूनद देखील एकदिवसीय स्वरूपात सक्रियपणे खेळत ऱ्हानार आहे. कोहलीने त्याच्या कारकिर्दीत १२३ कसोटी सामन्यांमध्ये ३० शतके आणि ९,२३० धावा केल्या आहेत, यावरून त्याच्या क्षमतेची जाणीव होते.