Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी शुभमन गिल संघाबाहेर गेला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 17, 2025 | 08:46 PM
IND vs SA 4th T20I: A setback for India before the fourth T20 match! A star player from the team is out; the reason has been revealed.

IND vs SA 4th T20I: A setback for India before the fourth T20 match! A star player from the team is out; the reason has been revealed.

Follow Us
Close
Follow Us:

Shubman Gill is out of the fourth T20I :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना लखनौ येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.   भारताचा T20I संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. मालिकेतील महत्त्वाच्या टप्प्यावर गिलची अनुपस्थिती संघ व्यवस्थापनासाठी अडचणीचे कारण बनले आहे.

हेही वाचा : CSK, मुंबई ते RCBपासून सर्व संघापर्यंत…; IPL 2026 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या संघांच्या ताफ्याची यादी वाचली का? मग वाचाच एकदा

शुभमन गिल संघाबाहेर

टी20I स्वरूपात पुनरागमन केल्यानंतर शुभमन गिल भारताचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले तेव्हापासून, तो सातत्याने प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला आहे, परंतु त्याची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20I आधी तो खेळेल अशी अपेक्षा असताना त्याला पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. दुखापतीच्या तीव्रतेबद्दल बीसीसीआयने अद्याप काही एक अधिकृत माहिती दिलेली नाही.

शुभमन गिलची कामगिरी खालावली

टी-२० विश्वचषकापूर्वी शुभमन गिलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्याचे सातत्याने धावा न काढने  त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास मदत करत आहेत. या टप्प्यावर, दुखापतीमुळे सामन्यांमधून त्याची अनुपस्थिती त्याला पुन्हा फॉर्म मिळवणे आणखी कठीण बनवू शकते असे बोलले जात आहे. जर दुखापत अधिक गंभीर असेल तर गिल अंतिम टी-२० सामना देखील खेळण्याची शक्यता कमीच आहे.

संघ व्यवस्थापन अडचणीत

शुभमन गिलच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सलामीवीरांच्या संयोजनावर आता अधिक विचार करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, संजू सॅमसनला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता बळवली आहे. सॅमसनने यापूर्वी संघासाठी टॉप ऑर्डरमध्ये सलामी किंवा फलंदाजी केली असून त्याला स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी असणार आहे.

हेही वाचा : Ashes series 2025 : शतकासाठी अ‍ॅलेक्स कॅरीचा ‘फ्रॉड’ गेम? VIDEO व्हायरल होताच ‘ती’ चूक समोर; चाहते ‘सदम्यात’

वाचा भारतीय संघाचा अपडेटेड स्क्वॉड

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद

दक्षिण आफ्रिकाः एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेड्रिक्स, देवाल्ड बुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, माकों जानसेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, अॅरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज आणि जॉर्ज लिंडे.

Web Title: Ind vs sa vice captain shubman gill ruled out of the team before the fourth t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Shubhman Gill
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 
1

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 

IND vs NZ 5Th T20: ‘सूर्या’ पुन्हा तळपला! न्यूझीलंडविरुद्ध 63 धावांची तडाखेबंद खेळी
2

IND vs NZ 5Th T20: ‘सूर्या’ पुन्हा तळपला! न्यूझीलंडविरुद्ध 63 धावांची तडाखेबंद खेळी

IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये संजू फेल, इशान किशन पास; 28 चेंडूत झळकवले अर्धशतक; किवी गोलंदाज बेजार 
3

IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये संजू फेल, इशान किशन पास; 28 चेंडूत झळकवले अर्धशतक; किवी गोलंदाज बेजार 

Ireland vs UAE : पॉल स्टर्लिंगचा हिटमॅनला शोबी पछाड! मोडला रोहित शर्माचा ‘तो’ विश्वविक्रम 
4

Ireland vs UAE : पॉल स्टर्लिंगचा हिटमॅनला शोबी पछाड! मोडला रोहित शर्माचा ‘तो’ विश्वविक्रम 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.