बेन स्टोक्स आणि जो रूट(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. आतापर्यंत या मालिकेतील ३ सामने खेळले गेला आहेत. या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. नुकताच लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना खेळाला गेला जो खूप रोमांचक असा होता. या सामन्यात इंग्लंडकडून भारताचा २२ धावांनी पराभव करण्यात आला. या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्स भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. लॉर्ड्स कसोटी दरम्यान स्टोक्सला दुखापत असून देखील शेवटच्या दिवशी १०-१० षटके गोलंदाजी केली. यावरून संघासाठी त्याची निष्ठा दिसून येते. परंतु, इंग्लिश संघात सारे काही ठीक नसल्याचे समोर येत आहे.
इंग्लंड संघाचा आघाडीचा स्टार फलंदाज जो रूटने कर्णधार बेन स्टोक्सवर काही आरोप केले आहेत. त्याने म्हटले आहे की, बेन स्टोक्स त्याचे ऐकत नसल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता चाहत्यांना वाटू लागले आहे की, इंग्लिश संघात सारे काही ठीक नाही. त्याच वेळी, रूटने केलेले विधान बघता, असे काही असल्याचे दिसून येत नाही. त्याच्या विधानामध्ये रूटने कर्णधार स्टोक्सच्या मानसिकतेबद्दल आणि वर्तनाबद्दल भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की स्टोक्स हा अशाच प्रकारचा माणूस आहे.
हेही वाचा : अबब! IPL बनली पैशांची खदान; या वर्षात BCCI ने केली तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई
चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड फलंदाज जो रूटला कर्णधार स्टोक्सच्या कामाच्या भाराबाबत विचारण्यात आले. या प्रश्नावर त्याने उत्तर दिले आहे की, “तुम्ही प्रयत्न करू शकता, पण त्यामुळे काही एक फरक पडणार नाही. मी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मी त्याला हे सांगितले, पण तो माझे काजी ऐकत नाही. मी कर्णधार असताना देखील त्याने माझे ऐकले नव्हते. आता हा निर्णय त्याचा आहे.”
पुढे, रूट म्हणाला, “मला वाटते की तो असा माणूस आहे. जो फक्त अशा गोष्टी करण्यासाठी उत्सुक दिसतो. खरोखर, हे आपल्याला पुढे जाण्यासाठी एक चांगले लक्षण आहे. तो आता त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे.”
यानंतर, महान इंग्लिश फलंदाज म्हणाला, “स्टोक्स सामन्यात जिंकण्याची इच्छा बाळगण्याच्या मानसिकतेने भरलेला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की तो आमचा नेता आहे. मला फक्त एक भीती वाटत होती की त्याला काही गंभीर दुखापतींनंतर तो खेळात पुढे जाऊ शकणार नाही, परंतु आता मात्र त्याला त्याच्या शरीरावर पूर्ण विश्वास आहे. स्टोक्सची त्याच्या शारीरिक स्थितीवर चांगली अशी पकड आहे.”
हेही वाचा : टी-२० क्रिकेटमध्ये जोस बटलरचे वादळ! ‘किंग’ कोहली आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ गेलच्या खास पंक्तीत झाला सामील..
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील आगामी चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवण्यात येणार आहे.