Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने यूएईविरुद्धच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या या दिग्गज लेग-स्पिनरने टी-२० फॉरमॅटमध्ये ७०० विकेट्सचा टप्पा गाठून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 05:37 PM
AFG vs UAE, T20 World Cup 2026: Rashid Khan is the boss of T20 cricket! 'Ha' Bhim created special history by performing a feat

AFG vs UAE, T20 World Cup 2026: Rashid Khan is the boss of T20 cricket! 'Ha' Bhim created special history by performing a feat

Follow Us
Close
Follow Us:

Rashid Khan creates history in T20 cricket : अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या या  दिग्गज लेग-स्पिनरने टी-२० फॉरमॅटमध्ये ७०० विकेट्सचा टप्पा गाठून विश्वविक्रम रचला आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये ७०० विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. युएई विरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप सामन्यात त्याने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. या सामन्यात त्याने मोहम्मद अरफानला बाद करून आपली  ७०० वी विकेट मिळवली. यापूर्वी इतर कोणत्याही गोलंदाजाला टी-२० क्रिकेटमध्ये हा टप्पा  गाठण्यात यश आले नव्हते.

हेही वाचा : AFG vs UAE : अफगाणिस्तानच्या पदरात विश्वचषकाचा पहिला विजय! यूएईला 5 विकेट्सने केले पराभूत

टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप ५ गोलंदाज कोण?

रशीद खान टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो ५८२ सामन्यांमध्ये ६३१ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. त्याचा देशबांधव सुनील नारायण ५८३ सामन्यांमध्ये ६१३ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर ५७२ विकेट्ससह चौथ्या स्थानी आहे. या यादीत  वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल ५०८ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.  हे सर्व खेळाडू टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले असल्याने रशिदचा विक्रम मोडणे अत्यंत कठीण मानले जात आहे.

रशिद खानची टी२० कारकीर्द

रशिद खानने २०१५ मध्ये टी२० मध्ये पदार्पण केले केले होते. आजपर्यंत, त्याने ५१८ सामन्यांमध्ये ५१३ डावांमध्ये १८.५ च्या सरासरीने आणि ६.५९ च्या इकॉनॉमी रेटने ७०० विकेट्स चटकावल्या आहेत. या दरम्यान त्याने १८ वेळा चार विकेट्स आणि चार वेळा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. त्याच्या सातत्याने प्रभावी गोलंदाजीमुळे तो या फॉरमॅटमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर जमा आहे, त्याने आतापर्यंत १९१ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup : ‘गलत जगह U-turn…’, दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली! पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अफगाणिस्तानकडून यूएईचा ५ विकेट्स धुव्वा

यूएई विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने शानदार प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना युएईने २० षटकांत ९ गडी गमावून १६० धावा उभ्या केल्या. सोहेब खानने ४८ चेंडूत ६८ धावा आणि शराफूने ३१ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १९.२ षटकांत ५ गडी गमावून विजय मिळवला. सामन्यात उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी अझमतुल्लाह उमरझाईला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

Web Title: Afg vs uae t20 world cup 2026 rashid khan sets world record by taking 700 wickets in t20 cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Rashid Khan
  • T20 cricket
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
1

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.