Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये आज इंग्लंड विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात अत्यंत महत्वाचा सामना पार पडला. आजचा सामना दोघांसाठी करो या मरो या स्थितीत होता. या जबरदस्त रोमांचक सामन्यात विजय मिळवला आहे. अफगणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. आजच्या विजयामुळे या स्पर्धेत इंग्लंड बाहेर गेला आहे. तर अफगणिस्तानच्या आशा अजूनही जिवंत आहेत.
Wickets continue to tumble in Lahore! ⚡
Fazal Haq Farooqi strikes as Jofra Archer skies one straight up where Mohammad Nabi settled himself up to get Afghanistan even closer. 👏
One more strike! #AfghanAtalan | #ChampionsTrophy | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/Mg6JaGnTOK
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 26, 2025
इब्राहिम जार्दानचा कहर; लाहोरच्या मैदानावर रचला इतिहास
अफगाणिस्तानच्या इब्राहिम जार्दानने आज लाहोरच्या मैदानावर मोठा कहर केला. यामध्ये इब्राहिम जार्दानने इंग्लडच्या गोलंदाजांची धुलाई करीत 135 चेंडूत 151 धावा केल्या. सलामीवीर गुरबाज आणि इब्राहिम यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, गुरबाज लवकर बाद झाला परंतु त्यानंतर इब्राहिम जार्दानने धमाकेदार खेळी करीत अफगाणिस्तानला 300 धावापर्यंत नेले.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 325 धावा केल्या. यामध्ये सलामीला आलेल्या इब्राहिम झार्दानने शानदार खेळी करीत 146 चेंडूत 177 धावा केल्या. गुरबाज आज विशेष प्रभाव पाडू शकला नाही, त्याने सलामीला येऊन 6 धावा केल्या. त्यानंतर सेदिकुल्लाह अटलने 4 धावा केल्या. त्यानंतर रहमद शाह अवघ्या 4 धावा करून बाद झाला. हशमुतुल्लाह शाहिदीने 67 चेंडूत 40 धावा केल्या. अझमुत्तुलाह ओमराझाईने 31 चेंडूत 41 धावा केल्या. मोहम्मद नईबने 24 चेंडूत 40 धावा केल्या. आज अफगाणिस्तानकडून इब्राहिम झार्दानने इंग्लडसारख्या बलाढ्य संघाच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली. इब्राहिम झार्दानने वेगवान 177 धावा केल्या.
शतक ठोकल्यानंतर झद्रानने असा साजरा केला आनंद
२३ वर्षीय इब्राहिम झद्रानने शतक ठोकल्यानंतर वेगळ्याच शैलीत आनंद साजरा केला. शतक पूर्ण केल्यानंतर, जद्रानने त्याचे हेल्मेट काढले आणि हात जोडले. ड्रेसिंग रूमकडे पाहत तो काहीतरी इशारा करत होता. झद्रान हा अफगाणिस्तानचा असाच एक फलंदाज आहे जो संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. जद्रानच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. झद्रान रहमानउल्लाह गुरबाजनंतर तो अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. गुरबाजने एकदिवसीय सामन्यात ८ शतके केली आहेत.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता अफगाणिस्तान एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात जो संघ हरेल तो उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. गेल्या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही अफगाणिस्तानने प्रवेश केला होता, ज्यामध्ये त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.