फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद शामी : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याला त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याची सर्जरी झाली होती त्यामुळे तो २०२३ पासून संघाबाहेर आहेत. त्यामुळे तो T२० विश्वचषक २०२४ मध्ये सुद्धा खेळला नाही. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शामीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली होती यामध्ये तो त्याच्या मुलीला घेऊन मॉलमध्ये गेला होता. तो बऱ्याच महिन्यानंतर त्याच्या मुलीला भेटला होता असे त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
आता त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, यामध्ये मोहम्मद शामीच्या पत्नीने पुन्हा खेळाडूंवर आरोप केले आहेत. इंस्टाबॉलीवूडने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मोहम्मद शामी जेव्हा त्याच्या मुलीला भेटला त्यानंतर तिने मोहम्मद शामीवर आरोप केले आहेत. मोहम्मद शामीच्या पत्नी हसीन जहान म्हंटली आहे की, “हे फक्त दिखावा करण्यासाठी आहे. माझ्या मुलीच्या पासपोर्टची मुदत संपली आहे. नवीन पासपोर्टसाठी शमीची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यामुळेच ती वडिलांना भेटायला गेली पण शमीने सही केली नाही. तो तिच्या मुलीसोबत एका शॉपिंग मॉलमध्ये गेला होता. शमी ज्या कंपनीसाठी जाहिरात करतो, तो तिला तिथे घेऊन गेला. माझ्या मुलीने त्या दुकानातून बूट आणि कपडे घेतले. तिथून काही खरेदी केल्यास शमीला पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे तिला तिथे नेण्यात आले. माझ्या मुलीला गिटार आणि कॅमेरा हवा होता, त्याने तिला ते सामान विकत घेतले नाही” असे म्हंटले आहे.
लवकरच क्रिकेटर मोहम्मद शामी भारतीय क्रिकेट संघामध्ये पुनरागमन करणार आहे. काही वृत्त आले आहेत त्यामध्ये म्हंटले आहे की, भारत विरुद्ध न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये मोहम्मद शामी संघात पुनरागमन करणार असे सांगितले जात आहे, त्यामुळे अजुनपर्यत या वृत्तांमध्ये किती सत्य आहे हे उघड झालं नाही.