
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
IND vs PAK, Ishan Kishan Half Century : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक सामना रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. सलामीवीर अभिषेक शर्मा एकही धाव न घेता बाद झाला. कर्णधार सलमान अली आघा याने त्याला बाद केले. पॉवरप्लेमध्ये भारताने एक विकेट गमावून 52 धावा केल्या. इशान किशन आणि तिलक वर्मा क्रीजवर आहेत. या दोघांनी कमालीची कामगिरी करत आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने धमाकेदार अर्धशतक झळकावले. आक्रमक फलंदाजी करताना इशानने केवळ २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. किशनने ५५ धावा केल्या आहेत, तर तिलक वर्मा १० धावा करत आहे. अभिषेक शर्मा सलग दुसऱ्या विश्वचषकाच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला आहे. मागील सामन्यामध्ये तो खेळला नाही. आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवणार तो संघ सुपर 8 चे तिकीट मिळवणार आहे.
Half-Century in no time! 👊 Ishan Kishan brings up his 5️⃣0️⃣ off just 27 balls! Updates ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/0MJztCv81J — BCCI (@BCCI) February 15, 2026
मागील काही दिवसांपासून ज्याप्रकारे वातावरण होते त्यानंतर भारताच्या संघाने कमालीची कामगिरी 8 ओव्हरमध्ये केली आहे, इशान किशनने पाकिस्तानी गोलंदाजांवर दबाव आणला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सलमान अली आघा यांनी सांगितले की पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही, तर भारतीय संघाने दोन बदल केले आहेत. अभिषेक शर्माने संजू सॅमसनची जागा घेतली, तर कुलदीप यादवने अर्शदीपची जागा घेतली. पोटाच्या संसर्गामुळे अभिषेक नामिबियाविरुद्धच्या मागील सामन्याला मुकला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. सलमान अली आघाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने एका चुरशीच्या सामन्यात नेदरलँड्सचा तीन विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात भारताने नामिबियाचा ९३ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात अमेरिकेवर ३२ धावांनी विजय मिळवला.