
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
कोलंबोच्या प्रेमादासा मैदानावर सुरू असलेल्या या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत दंमदार फलंदाजी केली. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा पहिला टप्पा पार पडला यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 176 धाावांचे लक्ष्य उभे केले होते. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही भारताचा सलामी वीर फलंदाज अभिषेक शर्मा हा शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनीही डाव सांभाळला आणि भारताला मजबूत स्थितीत उभे केले.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्मा ४ चेंडू खेळून एकही धाव न करता पव्हेलियनमध्ये परतला. तर इशान किशनची दमदार खेळीने भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले आहे. इशान किशनने २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ४० चेंडूत १० चौकार आणि तीन षटकार मारत ७७ धावा केल्या. इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये महत्वाची भागीदारी पाहायला मिळाली.
Innings Break! Ishan Kishan’s half-century and contribution from the middle order help #TeamIndia finish with 1️⃣7️⃣5️⃣ Time for the bowlers now! Updates ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/as8NDjIG8M — BCCI (@BCCI) February 15, 2026
उस्मान तारिकला ११ व्या षटकात गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली आणि त्याने त्याच्या पहिल्याच षटकात ६ धावा दिल्या. तिलक वर्मा २४ चेंडूत फक्त २५ धावा करू शकला. पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक पंड्या झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. शिवम दुबे १७ चेंडूत २७ धावा करून धावबाद झाला. पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेल झेलबाद झाला. पाकिस्तानकडून सैम अयुबने तीन, तर उस्मान, शाहीन आणि सलमानने प्रत्येकी एक बळी घेतला.
IND vs PAK : अभिषेक फेल तर इशान किशनचा प्रेमादासा मैदानावर कहर! ठोकले अर्धशतक
भारत-पाकिस्तानचा हा सामना अनेक वादाच्या भोवऱ्यात पाहिला जात आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची चर्चा केली होती, परंतु काही दिवसांनी त्यांनी यू-टर्न घेतला आणि खेळण्यास होकार दिला. भारताचा शेवटचा लीग सामना हा नेदलॅडविरुद्ध सामना होणार आहे.