कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या कारकिर्दीला लागला का पूर्णविराम? अखेर का घातली 4 वर्षांची बंदी, जाणून घ्या सविस्तर
Impact On Bajrang Punia Career After Suspended : देशाचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने 4 वर्षांसाठी निलंबित केले आहे. यामुळे बजरंग पुनियाच्या करिअर दूरगामी परिणाम होणार आहेत. आता भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) 4 वर्षांसाठी निलंबित केले केल्यानंतर त्याची कारकीर्द संपली का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मंगळवारी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने बजरंगला निलंबित केले. पुनियाने 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवडीदरम्यान डोप चाचणीसाठी आपला नमुना देण्यास नकार दिला होता.
मागील वर्षभरापासून हे प्रकरण सुरू
बजरंग पुनियाचे निलंबन २३ एप्रिल २०२४ पासून सुरू झाले होते. यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनेही त्याला निलंबित केले. तथापि, बजरंगने निलंबनाविरुद्ध अपील केले होते, जे 31 मे रोजी अँटी-डिसिप्लिनरी डोपिंग पॅनेलने (ADDP) रद्द केले होते. यानंतर नाडाने बजरंगला २३ जून रोजी नोटीस दिली होती. या बंदीनंतर त्याच्या कारकिर्दीवर साहजिकच मोठा परिणाम होणार आहे.
बजरंग पुनियाने केले गंभीर आरोप
दरम्यान, बजरंग पुनियाने नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीने बंदी घातल्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘नाडा’ने घातलेल्या बंदीवर कोर्टात अपिल करणार आहे. ही लढाई कोर्टात सुरूच आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहेच, सोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांचासुद्धा यामध्ये हात आहे. असा घणाघाती आरोपदेखील केला.
पुन्हा एकदा पुनरागमन खेळाडूसाठी अवघड
कोणत्याही खेळाडूला दुखापतीनंतर किंवा दीर्घ बंदीनंतर पुनरागमन करणे खूप अवघड असते. अशा बंदीनंतर खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात येते, असे अनेकदा मानले जाते. आता या बंदीचा बजरंग पुनियाच्या कारकिर्दीवर काय परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बजरंगने नकार दिल्याने 4 वर्षांसाठी केले निलंबित
अनुशासनात्मक डोपिंग पॅनेलने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पॅनेल मानते की ऍथलीट कलम 10.3.1 अंतर्गत मंजूरींना जबाबदार आहे आणि 4 वर्षांच्या कालावधीसाठी अपात्रतेस जबाबदार आहे. निलंबनाचा अर्थ असा आहे की बजरंग 4 वर्षे स्पर्धात्मक कुस्तीमध्ये परत येऊ शकणार नाही आणि जर त्याला तसे करायचे असेल तर तो परदेशात कोचिंग नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही. बजरंगसाठी नाडाने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. बजरंगने नकार दिल्याने त्याला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
बजरंगने नुकताच केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश
बजरंग आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे हे विशेष. त्याची सहकारी कुस्तीपटू विनेश फोगटसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया याने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला होता. त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. आता त्यांच्याकडे अखिल भारतीय किसान काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली आहे. बजरंगची सहकारी पैलवान विनेश फोगाट हरियाणाच्या जुलाना विधानसभेतून आमदार म्हणून निवडूनदेखील आली आहे.