'Our fast bowlers...', a worry haunts captain Harmanpreet Kaur before the ODI World Cup..
One Day World Cup : भारतीय महिला संघाने कालच (११ मे) कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध ९७ धावांनी विजय मिळवला. हरमनप्रीत कौरला एक चिंता जाणवत होती. तिच्या वेगवान गोलंदाजांना होणाऱ्या सततच्या दुखापतींबद्दल तिने चिंता व्यक्त केली. तिने म्हटले की, सपोर्ट स्टाफ एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंकेत पार पडलेल्या तिरंगी मालिके भारतीय महिला संघाने या मालिकेत एकूण पाच सामने खेळले, त्यापैकी चार सामने जिंकून ट्रॉफीवर कब्जा केला आहे.
सामना समारंभात तिने सांगितले की तिला संपूर्ण संघाच्या कामगिरीचा अभिमान आहे. संघाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आम्हाला नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करायची होती. या सामन्यात संघाने ज्या पद्धतीने खेळ केला त्यावर आम्ही खूप आनंदी आहोत.
प्रथम फलंदाजी करताना, भारताने ७ बाद ३४२ धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांनी २४५ धावांत गारद केले. उपकर्णधार स्मृती मानधना ही भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली आहे. तिने शानदार शतक झळकावून भारताला चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, अमनजोत कौर आणि हरमनप्रीत यांनी उपयुक्त खेळी करून भारताला ३०० च्या पार नेले.
हरमनप्रीत कौरकडून संघातील गोलंदाजांना झालेल्या दुखापतींबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ती म्हणाली की, “आपण कधीही सुधारणा थांबवू शकत नाही. असे अनेक विभाग आहेत ज्यात आम्ही चांगली कामगिरी करू शकतो, मग ते फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. आपले वेगवान गोलंदाज जखमी होत राहतात. ही एक अशी गोष्ट आहे जीथे आपल्याला काळजी घ्यावी लगता असते. प्रशिक्षक त्यावर काम करत आहेत. असे देखील तिने सांगितले.
पुढे, कौर म्हणाली की, स्मृती आणि मी वगळता इतर फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती खूप सकारात्मक अशी होती. स्नेह राणाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती देखील खूपच सुंदर आणि सकारात्मक होती. बोलण्यासाठी खूप सकारात्मक गोष्टी आहेत पण सध्या मला हा क्षण एन्जॉय करायचा असल्याचे कौरने नमूद केले. १५ विकेट्स घेतल्याबद्दल स्नेहला मालिकावीर म्हणून तर मंधानाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे.