शाहिद आफ्रिदी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(फोटो- सोशल मिडिया)
India pak war : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तनाव वाढताना दिसत आहे. अशावेळी दोन्ही देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची गरळ ओकने सूरु आहे. त्याच्या निरर्थक चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीत. भारताकडून अपमानित झाल्यानंतर देखील त्यांना शुद्ध येताना दिसत नाहीये. तो सतत भारताविरुद्ध विष ओकत असतो. एवढेच नाही तर आता तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाणा बनवले आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणी हल्ले केले. त्यानंतर तणाव पुन्हा वाढत गेला. परंतु नंतर युद्धबंदी करारावर पाकिस्तान वेगळाच अजेंडा राबवत आहे. तो आपल्या लोकांना सांगत आहे की भारताने भीतीपोटी आपली माघार घेतली आहे.आफ्रिदीला देखील असेच काहीसे म्हणायचे आहे.
रविवारी पाकिस्तानी सैन्याचे कौतुक करत असताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, भारतीय आक्रमणाला हे निर्णायक प्रत्युत्तर होते. तसेच तो पुढे म्हणाला की, “नवी दिल्लीने इस्लामाबादला कमी लेखले होते. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धाच्या वेडाने भारताला अडचणीत आणले आहे.”
कराचीतील सी व्ह्यू येथे आयोजित “युम-ए-तशकुर” (कृतज्ञता दिन) रॅलीत बोलत असताना आफ्रिदी म्हणाला की, ‘पाकिस्तानशी संघर्ष करणे किती महागात पडते हे पंतप्रधान मोदींना आता कळले आहे.’
यापूर्वी देखील शाहिद आफ्रिदीच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचे दिसत होता. जोरदार वाऱ्यांमध्ये, शाहिद आफ्रिदी त्याच्या घराच्या टेरेसवर “माझी आशा, माझा विश्वास, माझे शौर्य, माझे सामर्थ्य आणि माझे भविष्य” या कॅप्शनसह फेरफटका मारताना दिसून आला.
हेही वाचा : सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी कुठे आहे? टी-शर्टवर लिहिला एक खास संदेश लिहिला; विमानाचा Video Viral
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत बदला घेतला आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले. ज्यामध्ये १०० दहशतवादी मारले गेलेआहेत.
त्याच वेळी, अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात आली. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्पष्टकरण्यात आले की, जर पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्यात आला तर तो युद्ध म्हणून गणला जाईल आणि त्यानंतर शत्रूंना योग्य उत्तर देण्यात येईल. असे मोदी म्हणाले होते.