फोटो सौजन्य - राज शमामी युट्युब/सोशल मीडिया
गौतम गंभीर : भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या भारताच्या क्रिकेट संघाची आगामी मालिका बांग्लादेश विरुद्ध होणार आहे त्यासाठी संघाला तयार करण्यात व्यस्त आहे. कोच गौतम गंभीर हा भारताचा माजी खेळाडू आहे आणि तो त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. अनेकवेळा तो मैदानावर खेळाडूंशी भांडताना दिसला. मात्र केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही गंभीरची वृत्ती तशीच आहे. आता भारताचा प्रसिद्ध कॉमेंटेटर आणि माजी खेळाडू आकाश चोप्राने एक गौतम गंभीर संदर्भात मोठा खुलासा केला आहे. आकाश चोप्राने युट्युब चॅनेलला एक मुलाखत दिली त्यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत साध्य त्याची ही मुलाखत प्रचंड व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – आयर्लंड महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! 5 विकेट्सने केलं पराभूत
आकाश चोप्राने एका पॉडकास्टदरम्यान गंभीरच्या ट्रक ड्रायव्हरसोबत झालेल्या भांडणाची कथा सांगितली आहे. ज्यामध्ये गंभीरने ट्रक ड्रायव्हरची कॉलर पकडली होती. त्यांनी राज शामानी यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये सांगितले की, “गौतम गंभीर दिल्लीत आला आणि त्याने सांगितले की एकदा त्याची एका ट्रक ड्रायव्हरशी भांडण झालं होतं. ट्रकचालकाने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून शिवीगाळ केल्याने हाणामारी झाली. त्यानंतर गंभीरने आपली कार थांबवली आणि ट्रकवर चढला आणि ड्रायव्हरची कॉलर पकडली. मी म्हणालो गौती तू काय करत आहेस. तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि तू खूप लहान आहेस, असे आकाश चोप्राने सांगितले, पुढे तो म्हणाला की, त्यामुळेच तो गौतम बनला आहे.”
पॉडकास्टमध्ये आकाश चोप्राने पुढे सांगितले की, जेव्हा ते खेळले तेव्हा दिल्लीचा संघ इतका चांगला होता की त्यात धवन किंवा कोहलीपैकी एकालाच संधी मिळू शकते. मी आणि गौती स्पर्धात्मक होतो कारण आमची लढत एकाच जागेसाठी होती (ओपनिंग). आमची टीम खूप चांगली होती. आम्ही खेळलो तेव्हा कोहली आणि धवनपैकी एकालाच खेळण्याची संधी मिळाली. वीरूलाही त्या संघात सलामी मिळू शकली नाही. वीरूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली जेणेकरून आम्ही शिखर किंवा विराटला तिसऱ्या क्रमांकावर ठेवू शकू.