फोटो सौजन्य - आयर्लंड क्रिकेट सोशल मीडिया
आयर्लंड विरुद्ध इंग्लंड : रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20I सामन्यात आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवून इतिहास रचला. आयर्लंडने इंग्लंडच्या महिला संघाला T20I सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या T20I सामन्यात आयर्लंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
आयर्लंड विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज दुसरा T२० सामना पार पडला. पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने केट क्रॉसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडच्या संघाला ६७ धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये पहिला विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने दमदार कामगिरी करत आयर्लंडच्या संघाला १०९ धावांवर सर्वबाद केले. यावेळी इंग्लंडच्या संघाने आयर्लंड समोर १७६ धावांचे लक्ष्य उभे केले होते. आज या दोन्ही संघांमध्ये मालिकेचा दुसरा सामना रंगला होता.
YES!!! A famous win in Clontarf! 🎉
We defeat England for the first time in a T20I! 🙌
▪️ England 169-8 (20 overs)
▪️ Ireland 170-5 (19.5 overs)SCORE: https://t.co/fvaBNHlTFc
MATCH PROGRAMME: https://t.co/QezDHP01u5
WATCH: Virgin Media Two in ROI
WATCH: TNT Sports in UK… pic.twitter.com/xJzk2cjbc1— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 15, 2024
इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यामधील झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लडच्या संघाने आव्हान स्वीकारत १६९ धावा केल्या होत्या. तमसिन ब्यूमॉन्ट हिने संघासाठी ४० धावा केल्या तर पैंज सचोल्फिइड हिने ३४ धावा करून शकली. इंग्लंडच्या संघाचे आयर्लंडच्या गोलंदाजांनी ८ बळी घेतले. आयर्लंडच्या संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर ऑर्ला प्रेंडरगास्ट हिने दमदार फलंदाजी करत इंग्लंडच्या महिला गोलंदाजांचा घाम गाळला. तीन ५१ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत उभे केले. त्याचबरोबर कर्णधार गॅबी लुईसने ३५ चेंडूंमध्ये ३८ धावा करून ,महत्वाची खेळी खेळली.
आयर्लंडच्या संघाने सामन्यामध्ये १ चेंडूं राखून ५ विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला. आयर्लंडने इंग्लंडच्या महिला संघाला पराभूत करून नवा विक्रम नावावर केला आहे. आयर्लंड महिला संघाने पहिल्यांदाच हा इतिहास घडवला आहे.