फोटो सौजन्य - X (Lucknow Super Giants)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यामध्ये पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळला होता त्यानंतर दुसरा सामन्यांमध्ये बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागेवर भारतीय संघामध्ये मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप या तीन वेगवान गोलंदाजी तुकडी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आली होती. आकाशदीपने पहिल्या डावामध्ये चार विकेट्स घेतले होते तर दुसऱ्या डावात त्यांनी पाच विकेट्स घेतले होते. आणि भारताचे संघाने मालिकेचा हा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली होती.
त्यानंतर त्याला उर्वरित तीनही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. शेवटचे सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजीने फार काही चांगले कामगिरी केली नाही पण फलंदाजी नाही कमलीचा खेळ दाखवून सर्वाना चकित केले होते. आकाशदीप याने 65 धावांची खेळी खेळून इंग्लंडचा घाम गाळला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये २–२ अशी मालिका अनिर्णित राहिली. ज्या मालिकेनंतर आता भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप हा पहिल्यांदाच त्याच्या मूळ गावी गेला होता.
कोण आहे Saaniya Chandok? या कंपनीची मालक Arjun Tendulkar ची पार्टनर… जाणून इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स
रोहता जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे गावी देहरी येथे चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. त्याच्यासाठी चहा त्यांनी रस्त्यावर रांगा लावल्या होत्या त्याच बरोबर आकाशचे फुलांच्या हराने आणि जल्लोषात स्वागत केले आहे. आकाशदीपचा व्हिडिओ लखनऊ सुपर जॉईंट्सच्या ऑफिशियल पेजवर शेअर करण्यात आला आहे.
Everyone dreams of a homecoming like this. Akash Deep just got it. 💙 pic.twitter.com/0gdWbenv8Q
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 13, 2025
आकाशदीप याने भारताचे मुख्य कोच गौतम गंभीर यांचे कौतुक केले आहे तो म्हणाला की गौतम भाई है नेहमीच खूप उत्साही प्रशिक्षक आहे ते नेहमीच आम्हाला प्रेरणा देत असतात मी स्वतःवर जितका विश्वास ठेवतो त्यापेक्षा जास्त ते माझ्यावर ठेवतात माझ्या फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर असेल त्याने त्याच्या प्रशिक्षकावर कौतुकाच वर्षाव केला आहे.
4,4,4,4,4,4…CSK च्या या युवा खेळाडूने Andhra Premier League मध्ये घातला धुमाकूळ!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये त्याची आणि सिराजची जोडी ही यशस्वी ठरली. आकाशदीप आणि सिराज या दोघांनीही खेळलेले दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या संघाला विजय मिळाला आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णाने देखील चांगले कामगिरी केली होती. मोहम्मदने या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली होती.