भारतीय संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. अर्जुनचा साखरपुडा सानिया चांडोकशी झाला आहे. सानिया चांडोक ही रवी घई यांची नात आहे. मुंबईमधील घई कुटुंब हे एक मोठे आणि प्रसिद्ध बिझनेस कुटुंब आहे. रिपोर्ट्सनुसार, सान्या चांडोक ही सार्वजनिक व्यक्ती राहिलेली नाही. ती सोशल मीडियावरही कमी सक्रिय आहे. भारत सरकारच्या अधिकृत नोंदीनुसार, सान्या चांडोक ही मुंबईस्थित मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये नियुक्त पार्टनरशिपमध्ये आणि डायरेक्टर आहे.
मिस्टर पॉज पेट स्पा कुत्रे आणि मांजरींसाठी विविध प्रकारचे ग्रूमिंग उपचार देते. कोरियन मायक्रोबबल थेरपी आणि जपानी हायड्रोथेरपी सारख्या विशेष उपचारांमुळे कुत्र्यांच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेतली जाते. रिपोर्ट्सनुसार, सानिया चांडोक ही उद्योगपती रवी घई यांची नात आहे. मुबंईमध्ये घई कुटुंबाचे मोठे नाव आहे. घई परिवार हा प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब आहे. रवी घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत.
‘हँडशेक’ कॉन्ट्रोवर्सीवर वॉशिंग्टन सुंदरने सोडले मौन! म्हणाला – जेव्हा बरेच काही धोक्यात असते…
रवी इक्बाल घई हे ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे अध्यक्ष आहेत, ज्यांचे हॉस्पिटॅलिटी आणि आईस्क्रीम क्षेत्रात मजबूत अस्तित्व आहे. ते मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील आयकॉनिक क्वालिटी आईस्क्रीम ब्रँड आणि इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलचे संस्थापक इक्बाल कृष्णा ‘आयके’ घई यांचे पुत्र आहेत.
हा वारसा पुढे नेत, रवी घई यांनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आईस्क्रीम उत्पादन युनिट्स स्थापन केले आणि निर्यातीला चालना दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली, ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटीने विविधता आणली आहे, त्यांनी इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह येथील लक्झरी हॉटेलचे संचालन सुरू ठेवले आहे, तसेच त्यांचा नातू शिवन घई यांनी स्थापन केलेल्या आधुनिक आइस्क्रीम ब्रँड द ब्रुकलिन क्रीमरी सारख्या उपक्रमांनाही पाठिंबा दिला आहे.
सानिया चांडोक सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट पाहून याचा अंदाज येतो. सानियाचे इंस्टाग्रामवर एक खाजगी अकाउंट आहे, ज्याचे ८०५ फॉलोअर्स आहेत, त्याशिवाय सानिया १२०७ लोकांना फॉलो करते. अर्जुन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर देखील इन्स्टाग्रामवर सानियाला फॉलो करतात.