Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG : “तो संघ सर्वोत्तम नव्हताच…” इंग्लंडविरुद्धची कसोटी ड्रॉ राखणाऱ्या भारतीय संघाबद्दल दिग्गज खेळाडू काय बोलून गेला

शुभमन गिलच्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती, तो भारतीय संघ मजबूत नसल्याचे मत इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज अ‍ॅलिस्टर कुकने व्यक्त केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 27, 2025 | 04:35 PM
AUS vs ENG: "That team was never the best..." What a legendary player said about the Indian team that held England to a draw in the Test match.

AUS vs ENG: "That team was never the best..." What a legendary player said about the Indian team that held England to a draw in the Test match.

Follow Us
Close
Follow Us:

Alastair Cook’s comments about the Indian team : अनुभवी फलंदाज अ‍ॅलिस्टर कुकचे विधान सध्या चर्चेत आले आहे. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूने, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती, तो भारतीय संघ मजबूत नसल्याचे म्हटले आहे. कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने पहिल्या  मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत, चार शतकांच्या मदतीने ७५४ धावा फटकावल्या. कुक म्हणाला की, भारतीय संघ फारसा मजबूत नसल्याने इंग्लंड मालिका अनिर्णित राहू शकला आहे.

हेही वाचा : Indian Hockey : 2025 हे वर्ष भारतीय हॉकीसाठी वाईटच! पुरुष संघाचा आशिया कप जेतेपदावर कब्जा, तर महिला संघ अपयशी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान कुक म्हणाला की, “इंग्लंड संघ व्यवस्थापन भारताविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीबद्दल बोलत असून त्यांनी भारताविरुद्ध मालिका अनिर्णित राखली आहे. परंतु, हाच भारतीय संघ त्यांच्याच भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वाईटरित्या पराभूत झाला. त्यामुळे, इंग्लंडचा दौरा करणारा भारतीय संघ सर्वोत्तम भारतीय संघ नव्हताच.”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ अ‍ॅशेस पुन्हा मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २०११ पासून इंग्लंड संघाने प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटने दणदणीत पराभव केला आहे. इंग्लंडसमोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

१७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटने इंग्लंड संघाला ५१ धावांची भक्कम सुरुवात करून दिली. डकेट २६ चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. तर क्रॉलीने ३७ धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांव्यतिरिक्त, जेकब बेथेलने ४० धावा करून संघाचा मालिकेतील पहिला विजय निश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. तर हॅरी ब्रूक १८ आणि जेमी स्मिथ ३ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडने ६ विकेट गमावून १७८ धावा करून सामना आपल्या खिशात टाकला.

हेही वाचा : AUS vs ENG : “आम्ही जगात कुठेही गेलो तरी…” मेलबर्नमध्ये चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना जिंकल्यावर बेन स्टोक्सचे विधान चर्चेत…

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात १५२ धावाच करू शकला.  इंग्लंडकडून जोश टोंगने पाच बळी घेतले. मेलबर्न कसोटीचा निर्णय १४२ षटकांतच लागला. यादरम्यान ३६ विकेट्स पडल्या.

Web Title: Alastair cooks statement about the india vs england test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • AUS vs ENG
  • IND Vs ENG

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.