भारताने झिम्बाब्वेवर (India Vs Zimbabwe) दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली. २२ ऑगस्ट रोजी एक दिवशीय मालिकेतील तिसऱ्या सामना देखील भारताने १३ धावांनी जिंकून विजय मिळवला. भारताने मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. या मालिका विजयानंतर भारतीय खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले असून सर्व खेळाडू तुफान असा जल्लोष करताना दिसत होते.
शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात मालिका विजयानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूम मध्ये डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओत काला चष्मा या बॉलीवुड साँगवर खेळाडू नाचत असून ईशान किशन, शुभमन गिल, शिखर धवन हे सर्वाधिक धमाल करताना दिसत आहेत.
भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत नवीन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. सध्या भारतीय संघाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.