Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..

आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक पूर्ण केले. आनंद महिंद्रा यांनी त्याच्या खेळीचे खास कौतुक केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 23, 2025 | 06:55 PM
IND vs PAK: 'I don't have anything further to say...' Anand Mahindra is surprised to see Abhishek Sharma's destruction of Pakistani bowlers..

IND vs PAK: 'I don't have anything further to say...' Anand Mahindra is surprised to see Abhishek Sharma's destruction of Pakistani bowlers..

Follow Us
Close
Follow Us:
  • आनंद महिंद्राकडून अभिषेक शर्माचे कौतुक 
  • पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्माची ७४ धावांची तुफानी पारी 
  • आशिया कप सुपर ४ सामन्यात भारताकडून पाकिस्तान पराभूत 

Asia cup 2025 : आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी सुपर ४ सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने धूळ चारली होती. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. यामध्ये अभिषेक शर्माने आपल्या बॅटने कहरच केला. त्याने ३९ चेंडूत ७४ धावांची तुफानी खेळी केली. अभिषेकच्या या खेळीने माजी महान खेळाडू रविचंद्रन अश्विन आणि केविन पीटरसन यांना प्रभावित केले. आता यामध्ये अजून एका व्यक्तिची भर पडली आहे. अभिषेक शर्माच्या या खेळीने आनंद महिंद्रा देखील चकित झाले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

भारतीय माजी फिरकीपटू आर आश्विनने म्हटले आहे की, “हा तरुण खेळाडू भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनणार आहे.”  अभिषेक शर्माच्या खेळीने भारताने सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा सहज पराभव केला. यानंतर अभिषेकवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.

हेही वाचा : IND VS BAN : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेश अडचणीत! कर्णधार लिटन दास दुखापतग्रस्त; खेळण्याबाबत शंका…

सामन्यादरम्यान, पाकिस्तानी खेळाडू आणि अभिषेक यांच्यात काही शाब्दिक चकमक देखील झालेली पाहायला मिळाली.  भारताने सामना जिंकल्यानंतर सलामीवीर अभिषेककडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुम्ही बोला, आम्ही जिंकतो.” अभिषेक शर्माने ही पोस्ट शेअर करून पाकिस्तानी खेळाडूंना चोख प्रत्युत्तर दिले होते. हीच पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

या दरम्यान महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा  यांच्याकडून अभिषेकच्या पोस्टचे कौतुक करण्यात आले. महिंद्रा यांनी त्या पोस्टला त्यांचे सोमवारचे प्रेरणास्थान देखील बनवले. त्यांनी लिहिले कि, “आणखी काही बोलण्याची गरज नाही.” आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर तूफान  व्हायरल  होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका वापरकर्त्याकडून आनंद महिंद्रा यांना विचारण्यात आले की, “तुम्ही अभिषेक शर्माला थार भेट देणार नाही का?”

No more words need to be added. This post is my #MondayMotivation https://t.co/svrVCSEFfZ — anand mahindra (@anandmahindra) September 22, 2025

हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

आशिया कप  २०२५ च्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या भारतीय सलामीवीरांनी  १०५ धावांची भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला. अभिषेक शर्मा हा आशिया कप  स्पर्धेच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा (१७३) फलंदाज आहे.

Web Title: Anand mahindra praises abhishek sharmas innings against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Anand Mahindra
  • Anand Mahindra Tweet
  • Asia cup 2025
  • PAK vs IND

संबंधित बातम्या

IND VS BAN : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेश अडचणीत! कर्णधार लिटन दास दुखापतग्रस्त; खेळण्याबाबत शंका…
1

IND VS BAN : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेश अडचणीत! कर्णधार लिटन दास दुखापतग्रस्त; खेळण्याबाबत शंका…

PAK vs SL: श्रीलंका-पाकिस्तानसाठी आज ‘करो या मरो’ची लढत; हेड-टू-हेडमध्ये जाणून घ्या कोण आहे वरचढ
2

PAK vs SL: श्रीलंका-पाकिस्तानसाठी आज ‘करो या मरो’ची लढत; हेड-टू-हेडमध्ये जाणून घ्या कोण आहे वरचढ

Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 
3

Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 

IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 
4

IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.