
Anirudh Ravichander and Kavya Maran's clip goes viral! Spotted together in New York; Wedding rumors fueled
व्हिडिओमध्ये अनिरुद्ध आणि काव्यासोबत एक तिसरी व्यक्ती देखील दिसून येत आहे. हा व्हिडिओ अलीकडचा आहे की जुन्या ट्रिपच आहे याबबत अद्याप काही एक स्पष्ट झालेले नाही. पण, तरी देखील यामुळे ऑनलाइन जगतात खळबळ उडाली आहे. अनेक चाहत्यांना वाटते की दोघांमध्ये काहीतरी खास नाते चालले आहे. तर काहींनी या व्हिडिओचे फक्त एक कॅज्युअल आउटिंग म्हणून वर्णन केलेले आहे.
अनिरुद्ध आणि काव्याच्या नात्याबद्दल आधीच अफवा पसरलेल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या लग्नाच्या अफवा देखील समोर आल्या होत्या. त्यामुळे या व्हिडिओमुळे या अफवांना अधिकच बळकटी मिळाली आहे. अनिरुद्धने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक विनोदी पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “लग्न, अरे? हाहा… शांत व्हा मित्रांनो. अफवा पसरवणे थांबवा.”
Anirudh Ravichander and Kavya Maran spotted together in New York pic.twitter.com/6MequNeeAK — SRHyderabaddie (@sunrisers_memu) November 13, 2025
काव्या मारन ही सन ग्रुपच्या संस्थापक कलानिधी मारन यांची मुलगी असून मीडिया इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यावसायिक महिला देखील आहे. ती सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडची कार्यकारी संचालक आणि आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद (SRH), SA20 लीगच्या सनरायझर्स ईस्टर्न केप आणि हंड्रेड लीगच्या सनरायझर्स लीड्सची सह-मालक देखील आहे. आयपीएल हंगामादरम्यान तिचा उत्साह नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो.
हेही वाचा : Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
अनिरुद्ध रविचंदर हा आजच्या काळातील सर्वात यशस्वी तरुण संगीतकारांपैकी एक असून त्याने शाहरुख खानच्या “जवान” आणि अॅटलीच्या “थलापथी 68” सारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. तो लवकरच शाहरुख खानच्या “किंग” आणि थलापथी विजयच्या “जाना नायकन” या चित्रपटांसाठी संगीत तयार करताना दिसून येणार आहे.