रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma’s brilliance at Eden Gardens : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रम जमा आहेत. काहींनी त्यातीलल विक्रम मोडले तर काही अजून देखील अबाधित आहेत. त्यातील एक असा विक्रम आहे जो इतर कोणत्याही फलंदाजासाठी मोडणे कठीण ठरत आले आहे. रोहितन शर्माने एकाच एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची शानदार खेळी साकारली होती. १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. तत्कालीन कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता आणि त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची लाईन अँड लेंथ बिघडवण्यात लकसलीच कसूर सोडली नव्हती.
हेही वाचा : ज्युनियर वर्ल्ड कप ट्रॉफी लखनौमध्ये दाखल! उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून स्वागत
११ वर्षांपूर्वी खेळलेली रोहित शर्माची ही संस्मरणीय खेळी बीसीसीआयकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. . ‘एक्स’ वर पोस्ट करताना बीसीसीआयने लिहिले आहे की, “११ वर्षांपूर्वी रोहित शर्माने २६४ धावांची शानदार खेळी खेळली.” बीसीसीआयने सामन्याची एक व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली असून यामध्ये रोहित शर्मा श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला आणि त्याने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली.
या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला होता. त्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या डावाची सुरवात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या जोडीने केली. रहाणे आणि शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु रहाणेने २४ चेंडूत २८ धावा काढून बाद झाला.
pic.twitter.com/9tb1ykHq2u Watch his full record-breaking knock ▶️ https://t.co/sHk5XprYeD https://t.co/hEEXykmSyH — BCCI (@BCCI) November 13, 2025
भारताचा स्कोअर एक बाद ४० धावा असताना अंबाती रायुडू मैदानात आला. पण तो देखील जास्त काळ टिकू शकला नाही, १९ चेंडूत ८ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. भारताचा स्कोअर दोन बाद ५९ झाला तेव्हा रोहित शर्माने क्रीजवर एका टोकाला सांभाळून होता.
विराट कोहली आल्यानंतर तेव्हा कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघाला सावरले आणि २०० धावांची शानदार भागीदारी रचली. विराट बाद झाला तेव्हा संघाचा स्कोअर २६१ पर्यंत जाऊन पोहोचला होता. विराटने ६६ धावा केल्या होत्या. भारत आता सहज ३०० धावा गाठण्यास सज्ज दिसत होता, परंतु रोहित शर्माचे वादळ घोंघावू लागले. आधीच शतक झळकावल्यानंतर, रोहित शर्माने आपली फलंदाजी वेगवान केली आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांना टार्गेट करत त्यांना सळो की पळो करून सोडले. रोहित शर्माने सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांच्यासोबत भागीदारी रचतभारताला ४०४ धावांपर्यंत नेऊन ठेवले. रोहित शर्माने १७३ चेंडूत २६४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३३ चौकार आणि ९ षटकार मारले. प्रत्युत्तरादाखल, श्रीलंकेचा संघ २५१ धावाच करू शकला. भारताने हा सामना १५३ धावांनी जिंकला.






