कतार येथे सुरु असलेला फिफा विश्वचषक 2022 ला आता पूर्ण विराम लागला आहे. रविवारी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने शूटआऊट मध्ये फ्रान्सवर मात करून थरारक विजय मिळवला. तब्ब्ल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनानं फिफा विश्वचषकावर नाव कोरलं असून सोबतच मेस्सीचे संघाला विश्वविजेता बनवण्याचे स्वप्न साकार पूर्ण झाले आहे.
90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी दोन-दोन गोल केल्यामुळे अंतिम सामना अतिरिक्त वेळात गेला. त्यात मेसीच्या जादुई गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने फ्रान्सला 3-2 अशा गोलफरकानं मागे टाकले. पण, 118 मिनिटाला किलियन एम्बापे नावाचं वादळं पुन्हा धडकलं आणि फ्रान्सनं तिसरा गोल केला. त्यामुळे निर्धारित वेळ संपली आणि सामना पेनेल्टी शूटआऊटवर गेला.
पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकानं अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला. त्यात फ्रान्सकडून किलियन एम्बापेनं पहिला गोल केला. फ्रान्सला आघाडीवर नेल. पण त्यानंतर फ्रान्सच्या दोन खेळाडूंना गोल करता आला नाही. दुसरीकडे मेसीसेनेनं सलग तीन गोल केले होते. आणि पेनेल्टी शूटआऊटवर आपला ताबा मिळवला होता. चौथी किक फ्रान्सच्या रान्डाल कोलो माओनीनं मारली, गोलही केला. त्यानंतर अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलनं गोल केला आणि अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव करून इतिहास घडवला.