
AUS vs ENG: Steve Smith breaks 'India's wall'! He surpassed Rahul Dravid and created history in Test cricket; Read in detail.
Steve Smith broke Rahul Dravid’s record : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने मोठा कारनामा केला आहे. पाचव्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात शतक झळकावून स्मिथने भारताचा माजी कर्णधार दिग्गज राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता
इंग्लंडविरुद्धच्या या शतकासह, स्टीव्ह स्मिथच्या कसोटी कारकिर्दीत आता ३७ शतके जमा झाली आहेत. स्मिथने या बाबतीत राहुल द्रविडला देखील पिछाडीवर टाकले आहे. राहुल द्रविडने त्याच्या खेळण्याच्या काळात एकूण ३६ शतके ठोकली आहेत. राहुल द्रविडने १९९६ ते २०१२ पर्यंत एकूण १६४ कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने ३६ वेळा १०० धावांचा टप्पा पार केला आहे. तर स्मिथने त्याच्या १२३ व्या कसोटी सामन्यात शतक झळकवत राहुल द्रविडला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ आता सहाव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम भारतीय माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे.
या शतकासह, स्टीव्ह स्मिथ सर्वाधिक अॅशेस शतके झालकवणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान प्राप्त केले आहे. त्याने या पूर्वी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जॅक हॉब्ससोबत बरोबरीस साधली होती. पण आता ४१ अॅशेस कसोटीत १३ शतकांसह तो दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. अॅशेसमध्ये स्मिथपेक्षा जास्त शतके फक्त डॉन ब्रॅडमनने लागावळी आहेत. ब्रॅडमनच्या नावावर एकूण १९ अॅशेस शतके जमा आहेत.
हेही वाचा : दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध