ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. आयसीसीकडून चौथ्या अॅशेस कसोटी सामन्यातील खेळपट्टीला असमाधानकारक दर्जा देण्यात आला.
अॅशेस मालिकेतील चौथा कसोटीच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावा करण्याचा विक्रम रचला आहे.
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्यावर दबाव वाढत आहे. इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसर यांनी ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा सल्ला दिला आहे.
कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून शॉन पोलॉक (४२१ विकेट्स) यांना स्टार्केने मागे टाकले. विल जॅक्सला बाद केल्यानंतर स्टार्कने अॅशेसच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनला मागे टाकले
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना अॅलेडलेड येथे खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक कणाऱ्या अॅलेक्स कॅरीने खास कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सालामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याने एकाच मैदानावर लागोपाठ ४ शतके ठोकली आहेत.
पर्थमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीतून बरे न झाल्यामुळे ख्वाजाला गाबा कसोटीतून बाहेर काढण्यात आले होते, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला असे वाटत आहे की त्याला आता परत बोलवण्याची गरज नाही.
पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मार्क वूडला डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि आता तो उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे, ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
अॅशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील सामन्यापासून हेझलवूडला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास होत आहे,
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस २०२५ मधील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटने शानदार शतक ठोकले आहे.
नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे सलग दुसऱ्या अॅशेस कसोटीला मुकतील. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिका सुरू आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात कांगारू फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकवून इतिहास घडवला…
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ३५ वर्षांनंतर घडलेला पराक्रम केला. पहिल्या डावात इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांना १७२ धावांत गुंडाळण्यात आले, यासाठी स्टार्क जबाबदार होता.
३५ वर्षीय मिचेल स्टार्क जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा असे वाटते की तो २०-२५ वर्षांचा तरुण खेळाडू आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात मिचेल स्टार्कने इतका धोकादायक झेल घेतला की आजच्या तरुण…
मिचेल स्टार्क याने आज 7 विकेट्स घेऊन पहिल्याच डावामध्ये कहर केला आहे. या सामन्याच्या पहिल्या इंनिगमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
मिचेल स्टार्कने पहिले षटक टाकले आणि जॅक क्रॉलीला बाद करून ऑस्ट्रेलियाला मोठी कामगिरी करून दिली. मिचेल स्टार्क पहिल्याच षटकात विकेट घेण्यासाठी ओळखला जातो आणि त्याने पुन्हा एकदा ही कामगिरी केली.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिका २०२५ ला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या इतिहासात पाच वेगवान गोलदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.
अॅशेस मालिका ही आंतरराष्ट्रीय खेळातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. या कसोटी क्रिकेटची सुरुवात १८७७ मध्ये झाली.
आता हि मालिका कोण जिंकणार हे तर मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये समजणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल, एक सामना अनिर्णित राहिला आहे,…
मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी या अनुभवी खेळाडूची नियुक्ती केली आहे.