
Ashes Series 2025: Alex Carey's 'fraudulent' game for a century? As the video went viral, 'that' mistake came to light; fans are in 'shock'.
Alex Carey, Australia vs England : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी अॅशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील २ सामने खेळून झाले आहेत. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना अॅलेडलेड येथे खेळला जात आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ बाद ३२६ धावा केल्या आहेत. दरम्यान या सामन्यात एक वादग्रस्त घटना घडली. शतकवीर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरी दोषी आहे की नाही. याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
या त्याच्याविरुद्ध कॅच अपील केल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वास पूर्ण दिसून येत आहेत. तथापि, डीआरएस निकालांनी सर्वांनाच चकित करणारा निकाल दिला. चेंडू बॅटवर आदळण्यापूर्वी अल्ट्रा एज सिग्नल दिसत असला तरी व्हिडिओमध्ये चेंडू आणि बॅटमधील महत्त्वपूर्ण अंतर देखील दिसत आहेत. म्हणूनच सर्वांना धक्का बसला आहे. शेवटी, चेंडू आणि बॅटमधील अंतर लक्षात घेता, पंचांनी त्याला नॉट आउट करार दिला. या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होऊ लागले आहेत.
अॅलेक्स कॅरीचे तिसरे कसोटी शतक
अॅलेक्स कॅरीने अॅलेडलेडमध्ये मिळालेल्या जीवनदानाचा चांगलाच फायदा घेतला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या कॅरीने त्याचे तिसरे कसोटी शतक झळकवले. सामन्यादरम्यान सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने एकूण १४३ चेंडूंचा सामना करत ७४.१२ च्या स्ट्राईक रेटने १०६ धावा फटकावल्या. क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि एक सुंदर षटकार ठोकले. पहिल्या डावात कॅरीला विल जॅक्सने जेमी स्मिथकरवी झेलबाद करून माघारी पाठवले.
England were convinced that Alex Carey was gone, but what’s your take here?#Ashes | #DRSChallenge | @Westpac pic.twitter.com/g7bp7ptQXO — cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2025
हेही वाचा : ICC Ranking : सूर्याच्या साम्राज्याला ‘तिलक’ धोका! ICC रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप
अॅलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियासाठी एकूण ४६ कसोटी, ८५ एकदिवसीय आणि ४२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने ६८ कसोटी डावांमध्ये २२०५ धावा, ७७ एकदिवसीय डावांमध्ये ३५.०७ च्या सरासरीने २२४५ धावा तर २९ टी-२० डावांमध्ये ११.१२ च्या सरासरीने २६७ धावा फटकावल्या आहेत. कॅरीने कसोटी क्रिकेटमध्ये तीन शतके आणि १२ अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि १३ अर्धशतके लागावळी आहेत.