Coach Gautam Gambhir's troubles increase before Asia Cup 2025! Delhi High Court issues statement; What is the real issue?
Delhi High Court reprimands Gautam Gambhir : अलिकडेच इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय संघाने आपली क्षमता दाखवून दिली आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला भारतीय संघाने २-२ अशी बरोबरीत सोडवले. युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. आता भारतीय संघ आशिया कप २०२५ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. आशिया कप स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेमकं प्रकरण काय हे आपण बघूया.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेला गौतम गंभीर दिल्ली उच्च न्यायालयात अडचणीत सापडला आहे. त्याच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून गंभीर आणि त्याचे कुटुंब आणि फाउंडेशनविरुद्ध सुरू असलेली ट्रायल कोर्टाच्या कार्यवाही थांबवण्यास स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. यामुळेच आशिया कपपूर्वी गौतम गंभीर कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
कोविड-१९ दरम्यान औषधांच्या बेकायदेशीर वितरण आणि साठवणुकीशी संबंधित असणाऱ्या प्रकरणामध्ये गौतम गंभीरचे नाव अडकले आहे. आता न्यायमूर्ती नीना बन्सल यांनी या प्रकरणात टीम इंडियाच्या प्रशिक्षकाला दिलासा देण्याबाबत नकार दिला आहे. याशिवाय, न्यायाधीशांनी या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख देखील दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. जर असे झाले नाही, तर ट्रायल कोर्ट ८ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यवाही पुढे नेऊ शकते.
हेही वाचा : Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा..
दिल्ली ड्रग्ज कंट्रोल विभागाकडून माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या फाउंडेशनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, कोविडशी संबंधित औषधे परवान्याशिवाय गोळा करण्यात आले आणि वितरित केली गेली. या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू असून पुढील तारीख २९ ऑगस्ट ही निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयातून अद्याप कोणताही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही. परंतु जर गंभीर आणि त्यांच्या फाउंडेशनवरील आरोप सिद्ध झाले तर मात्र ते त्यांच्यासाठी आणि त्याच्या कुटुंब आणि सीईओंसाठी देखील एक मोठी समस्या ठरू शकते.