फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप सुरू व्हायला फक्त चार दिवस शिल्लक असताना आता भारताचा संघ हा दुबईला पोहोचला आहे. टीम इंडियाचे नेतृत्वाखाली अशिया कपमध्ये मैदानात उतरणार आहे भारताच्या संघाकडून टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी घेतलेल्या निवृत्तीनंतर भारताचा संघ पहिल्यांदाच ही मोठी स्पर्धा खेळताना दिसणार आहेत. बीसीसीआयचे निवडकर्ते अजित आगरकर आणि सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा केली होती.
चार दिवस शिल्लक असताना भारताच्या संघातील खेळाडू हे आता दुबईला पोहोचले आहेत. भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळताना दिसणार आहे. सुर्यकुमार यादव हा दुबईला जाताना पपाराझीने त्याला स्पाॅट केले यावेळी तो डॅशिग अवतारात पाहायला मिळाला. त्याचचबरोबर हार्दिक पांड्या देखील विमाणतळावर पाहायला मिळाला.
Captain Suryakumar Yadav and Hardik Pandya leave for Dubai ahead of the Men’s Asia Cup 2025.#Suryakumaryadav #Cricket #hardikpandya #AsiaCup2025 pic.twitter.com/jNI18BE4ci
— OneCricket (@OneCricketApp) September 4, 2025
कॅप्टनपद हे सूर्यकुमार यादव कडेच असणार आहे तर उपकर्णधारपद हे शुभमन गिल यांच्याकडे देण्यात आले आहे. संजू सॅमसनला सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे त्याचबरोबर मिळाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिलक वर्मा अभिषेक शर्मा या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अष्टपैलूमध्ये अक्षर पटेल, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे.
भारतीय गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर जसप्रीत बुमराह, अर्षदीप सिंग, हर्षित राणा यांसारख्या गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव आणि वरून चक्रवर्ती या दोन दिग्गज खेळाडूंना संघात खेळण्याची संधी मिळणार आहे विकेट कीपर मध्ये जिथे शर्माचे संघामध्ये पुनरागमन होणार आहेत तर संजू सॅमसन हा दुसरा पर्याय आहे. आशिया कपसाठी आठ संघ सहभागी झाले आहेत, यामध्ये भारताचा संघ हा पहिल्या गटामध्ये आहे.
पहिल्या गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटामध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँग काँग हे संघ लीग सामने खेळणार आहेत. भारताचा पहिला सामना हा युएई विरुद्ध खेळवला जाणार आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारताचा सामना हा १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना हा ओमान विरुद्ध खेळवला जाणार आहे. दोन्ही गटांमधील पहिल्या दोन स्थानावर असलेले संघ हे टॉप ४ मध्ये एंट्री करतील आणि एलिमिनेटर सामना खेळतील.