
Asia cup 2025: What to do with Pakistan? Reached the lowest level! Pycrofton's apology video goes viral..
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून दावा करण्यात आला आहे की, आशिया कप सामन्यादरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास मनाई केल्याबद्दल सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने पाकिस्तान संघाची माफी मागितली आहे. याचा आता एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : IND vs PAK: पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने, महामुकाबला की महावाद? रविवारी दुबईत रंगणार युद्ध
आयसीसीकडून पायक्रॉफ्टला काढून टाकण्यास नकार देण्यात आल्यावर निषेधार्थ पाकिस्तानने बुधवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यासाठी रवाना होण्यास उशीर केला आणि सामना एक तासाने उशीर झाला. पाकिस्तानने आता दावा केला की झिम्बाब्वेचे रेफरी पायक्रॉफ्ट यांनी यासाठी माफी देखील मागितली आहे.
एक्सवरील एका निवेदद्वारे पीसीबीने म्हटले आहे की वादग्रस्त आयसीसी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडून पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक आणि कर्णधाराची माफी मागण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पायक्रॉफ्टने दोन्ही संघांच्या कर्णधारांना हस्तांदोलन करण्यापासून रोखले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पायक्रॉफ्टच्या कृतीवर तीव्र आक्षेप व्यक्त केला. पायक्रॉफ्टने १४ सप्टेंबर रोजी झालेल्या प्रकाराला गैरसमजाचा परिणाम म्हणून वर्णन केले आणि माफी देखील मागितली.
🚨 Video clip of match referee Andy Pycroft apologising to Pakistan’s manager and captain. pic.twitter.com/VnBKM6ePBa — Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 17, 2025
पाकिस्तान बोर्डाकडून असा देखील दावा करण्यात आला आहे की, आयसीसी पायक्रॉफ्टविरुद्धच्या तक्रारीची चौकशी करणार आहे. त्यात म्हटले आहे की १४ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची चौकशी करण्याची तयारी आयसीसीकडून व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटले की, पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा जो निर्णय आहे तो पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांशी एकता व्यक्त करण्यासाठी घेतला गेला होता. ज्यामध्ये २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
या दरम्यान आयसीसीनकडून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टचा बचाव करण्यात आला आहे. आयसीसीने म्हटले आहे की त्यांनी नियमांनुसारच काम केले आणि त्यात काही एक चूक केलेली नाही.