Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं

Bangladesh Reached Asian Games Semi Final China Out: आशियाई क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत महिला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बांग्लादेशने कोणताही सामना न खेळता थेट त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 17, 2026 | 03:16 PM
Bangladesh Reached Asian Games Semi Final

Bangladesh Reached Asian Games Semi Final

Follow Us
Follow Us:
  • पावसामुळे सामना रद्द
  • बांग्लादेशची थेट सेमीफायनलमध्ये धडक
  • चीनच्या पदकाच्या आशांना धक्का
आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम महिलांची स्पर्धा होत आहे. यामध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले असून, सर्व सामने बाद फेरीचे आहेत. बांग्लादेश आणि चीन यांच्यात १७ सप्टेंबर रोजी उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार होता. कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५:३० वाजता सामन्यासा सुरुवात होणार होती, परंतु खराब हवामानामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. ज्यामुळे बांग्लादेशला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळाली.

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

बांग्लादेश संघ थेट सेमिफायनलमध्ये

बांग्लादेश आणि चीन यांच्यातील सामन्याची नाणेफेक होऊ शकली नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही, जेव्हा परिस्थिती सामन्यासाठी अनुकूल नव्हती, तेव्हा पंचांनी सामना रद्द घोषित केला. सामना रद्द होऊनही, बांग्लादेशने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, चीनचा प्रवास एकही सामना न खेळताच संपला.

२०२६ च्या आशियाई खेळांसाठी क्रिकेटचा एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाद फेरीचा सामना रद्द झाला, तर उच्च मानांकन असलेला संघ पुढील फेरीत जाईल. बांग्लादेशचे आयसीसी मानांकन आणि स्पर्धेतील मानांकन चीनपेक्षा जास्त आहे, तर चीन ३६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, चीनचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्रवास सामना न खेळताच संपला आणि बांग्लादेश पुढील फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यास बांग्लादेशला अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकण्याची संधी मिळेल. मात्र, उपांत्य फेरीत पराभव झाल्यास त्यांना कांस्यपदकासाठी सामना खेळावा लागेल.

निगार सुलतानाने कर्णधारपद सोडले

बांग्लादेश क्रिकेट संघालाही मोठा धक्का बसला आहे. निकार सुलतानाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर ती आता टी-२० संघाची कर्णधार राहणार नाही. तिला आपल्या फलंदाजी आणि विकेटकिपिंगवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तिने ईमेलद्वारे बोर्डाला ही माहिती दिली. मात्र, ती एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवत राहील. सुलताना २०२२ मध्ये टी-२० संघाची कर्णधार बनली होती. तिने आतापर्यंत ८० टी-२० सामन्यांमध्ये बांग्लादेशचे नेतृत्व केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करून संघाला यश मिळवून देण्याचा सुलतानाचा प्रयत्न असेल.

भारताचा सामना केव्हा होणार आहे?

भारतीय महिला संघाने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले. हा संघ जपानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दोन्ही संघांमधील उपांत्य फेरीचा सामना १८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. जर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर त्यांचा सामना बांग्लादेशवरुद्ध होण्याची शक्यता आहे. नुकतेच, भारतीय संघाने संपूर्ण आशिया चषकात एकतर्फी सर्व सामने जिंकून वर्चस्व गाजवले. आता भारतीय संघाचे लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर असेल.

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग

Web Title: Asian games 2026 bangladesh semi final china out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Bangladesh Cricket Team
  • China

संबंधित बातम्या

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?
1

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश
2

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स
3

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने
4

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.