Brendan Taylor breaks Sachin Tendulkar's ODI record
ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. टेलरने सचिन तेंडुलकरला मागे टाकून पुरुष एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक काळ खेळणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. त्याची एकदिवसीय कारकीर्द आता २२ वर्षे आणि १४८ दिवसांची झाली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता, जो २२ वर्षे आणि ९१ दिवसांचा होता. मात्र, आता ब्रेंडनने त्याला मागे टाकले आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या आहे. त्याची एकदिवसीय कारकीर्द २१ वर्षे आणि १८४ दिवस चालली. पाकिस्तानचा जावेद मियांदाद या यादीत चौथ्या क्रमांकावर असून, त्याची कारकीर्द २० वर्षे आणि २७२ दिवसांची आहे. झिम्बाब्वेच्या शॉन विल्यम्सची कारकीर्दही २० वर्षे आणि १८७ दिवसांची होती. परंतु, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही तेंडुलकरच्या नावावर आहे, त्याने ४६३ सामन्यांमध्ये १८,४२६ धावा केल्या आहेत.
आतापर्यंत त्याने झिम्बाब्वेसाठी ३७ कसोटी सामने खेळले असून,२,४२० धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत सहा शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, त्याने २०७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६,७०४ धावा केल्या असून, त्यात ११ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. ५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १,२१६ धावा केल्या असून, त्यात एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर






