Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश

US-Iran war : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग म्हणाले की, दोन्ही देशांनी "विवेक आणि संयम बाळगावा." त्यांनी असा इशाराही दिला की, "वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील सततचा संघर्ष दोन्ही बाजूंच्या हिताचा नाही."

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 16, 2026 | 04:23 PM
Iran Foreign Minister Beijing Visit Abbas Araghchi Wang Yi Meeting

Iran Foreign Minister Beijing Visit Abbas Araghchi Wang Yi Meeting

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा बीजिंग दौरा
  • चीनचे संयमाचे आवाहन
  • शी जिनपिंग-ट्रम्प भेटीपूर्वी मुत्सद्देगिरी

मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिघळत चालली असून जागतिक पातळीवर (US-Iran war) तणावाचे ढग अधिक गडद झाले आहेत. या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चीनची राजधानी बीजिंग येथे धाव घेतली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तीव्र संघर्ष लवकरात लवकर संपावा यासाठी चीन आता मध्यस्थाची भूमिका बजावताना दिसत आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात बीजिंगमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा पार पडली. या बैठकीत चीनने दोन्ही देशांना आक्रमक धोरण सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी वॉशिंग्टन आणि तेहरान या दोन्ही सत्तांना स्पष्ट शब्दांत इशारा देताना म्हटले की, “अमेरिका आणि इराण यांच्यातील सततचा संघर्ष दोन्ही बाजूंपैकी कोणाच्याही हिताचा नाही. दोन्ही देशांनी सध्याच्या अत्यंत संवेदनशील परिस्थितीत विवेक आणि संयम बाळगणे गरजेचे आहे.” प्रादेशिक तणाव आणखी वाढू नये, यासाठी लाल समुद्र आणि येमेनसारख्या प्रदेशांनाही संघर्षाच्या ज्वालांपासून दूर ठेवले पाहिजे, यावर चीनने विशेष भर दिला.

इस्लामाबाद कराराची चौकट पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी

वांग यी यांनी अमेरिका आणि इराणला प्रलंबित मुद्द्यांवर अर्थपूर्ण आणि सकारात्मक संवाद सुरू करण्याचे आवाहन केले. यापूर्वी इस्लामाबाद येथे झालेल्या सामंजस्य कराराचा (MOU) उल्लेख करत चीनने सांगितले की, दोन्ही देशांनी त्या करारांतर्गत ठरवून दिलेल्या संवादाच्या चौकटीकडे परत जाणे आवश्यक आहे. मध्यपूर्वेत यापूर्वी झालेला शांतता करार मोडल्यामुळे ही नवी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे जुन्या कराराचे गांभीर्य ओळखून पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असे मत चीनने व्यक्त केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

अमेरिकेसोबतच्या युद्धाला सुरुवात झाल्यापासून इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा दुसरा चीन दौरा आहे. यापूर्वी मे महिन्यात त्यांनी चीनला भेट दिली होती, जी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बैठकीच्या आधी झाली होती. योगायोग म्हणजे, अराघची यांचा हा चालू दौरादेखील शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टनमध्ये नियोजित असलेल्या शिखर परिषदेच्या अवघ्या काही दिवस आधी होत आहे. त्यामुळे जागतिक पटलावर चीन या संघर्षात कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्लीतील ब्रिक्स परिषद आणि ‘ग्लोबल साउथ’ची भूमिका

गेल्याच आठवड्यात नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यानही अराघची आणि वांग यी यांची भेट झाली होती. त्या परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘ग्लोबल साउथ’मधील ब्रिक्स देशांना मध्यपूर्वेतील युद्धात शांततारक्षकाची (Peacekeepers) भूमिका बजावण्याचे आवाहन केले होते. चीन या शांतता मोहिमेत सहकार्य करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे जिनपिंग यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ब्रिक्सच्या व्यासपिठानंतर लागलीच अराघचींचा बीजिंग दौरा होणे याला मोठे कूटनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! 500 दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा

चीन स्वतःला या युद्धात एका निष्पक्ष आणि तटस्थ मध्यस्थाच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, राजकीय आणि आर्थिक समीकरणांचा विचार केला असता, चीन हा इराणचा जगातील सर्वात मोठा आर्थिक भागीदार आहे. इराणकडून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलाचा बहुतांश हिस्सा चीन खरेदी करतो. त्यामुळे इराणची आर्थिक स्थिती स्थिर राहणे हे चीनच्या स्वतःच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची आपली भेट आटोपून बीजिंगहून रवाना होणार असले, तरी या दौऱ्यामुळे वॉशिंग्टनवर कूटनैतिक दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराणमधील हा संघर्ष शांतता कराराकडे वळणार की येत्या काळात आणखी उग्र रूप धारण करणार, हे पुढील काही दिवसांतील घडामोडींवरून स्पष्ट होईल.

Web Title: Iran foreign minister araghchi visits beijing china urges us iran peace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • China
  • US Iran Conflict
  • US Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार
1

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
2

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL
3

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! 500 दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा
4

Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! 500 दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.