
Asian Games 2026 India Medal Tally
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम दिवशी, भारताने तिरंदाजीमध्ये आपले पहिले सुवर्णपदक जिंकले. कुमकुम मोहोडने महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक स्पर्धेत विजय मिळवून इतिहास रचला. यानंतर, गोल्फमधील प्रणवी उर्सच्या प्रभावी कामगिरीने महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. इतकेच नव्हे, तर प्रणवीने महिला संघासोबत देशासाठी रौप्यपदकही जिंकले.
क्रिकेट आणि कुस्तीच्या मैदानातून भारतासटी दोन गोल्ड मेडल आले. पुरुषांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १९ धावांनी पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. भारताने २०२४ च्या एशियम गेम्समध्ये देखील सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, कुस्तीमध्ये युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक मिळवले.
भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावर सुवर्णअक्षरात विजय नोंदवला. अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा ५-१ अशा मोठ्या फरकाने पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे भारतीय हॉकी संघ २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरला आहे. याशिवाय, कुस्तीमध्ये अनंत पंघालने रौप्यपदक आणि दीपक पुनियाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकतालिकेला आणखी भर घातली.
या पाच सुवर्ण पदकांमुळे भारताने उझबेकिस्तानला मागे टाकत पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा प्रवास अत्यंत यशस्वी ठरला. बारतीय खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली.