
Asian Games 2026 : भारत आणि पाकिस्तान 'या' दिवशी खेळणार सेमिफायनल, हे आहे वेळापत्रक
हाँगकाँग, अफगाणिस्तान, मलेशिया आणि नेपाळ हे गटफेरीचे आव्हान पार करत क्वॉर्टर फायनलमध्ये पोहचल्या होत्या, पण त्यांना सेमिफायनलमध्ये आपली दावेदारी सादर करण्याची कोणतीच संधी मिळाली नाही. पावसाने त्यावर पाणी फेरले.
आता तेच चार संघ सेमिफायनलमध्ये दाखल झालेत, ज्यांना सीडिंग सिस्टम अंतर्गत थेट क्वॉर्टर फायनल खेळण्याचे तिकिट मिळाले होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानसमवेत इतर संघ केव्हा, कुठे व कोणासोबत सेमिफायनल खेळणार हे आता चित्र स्पष्ट झाले आहे.
एशियन गेम्स 2026 मधील दोन्ही सेमिफायनल सामने हे 1 ऑक्टोबरला खेळवले जातील. पहिला सेमिफायनल सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पार पडेल, तर दुसऱ्या सामन्यात भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान असेल.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सेमिफायनल सामना 1 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरू होईल. तर त्याच दिवशी भारत व श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल.
दुसरीकडे, एशियन्स गेम्समधील क्रिकेट स्पर्धा चर्चेचा विषय बनली आहे. गट फेरीपासून आतापर्यंतच्या अनेक सामने पावसामुळे रद्द झालेत. तर चारही क्वॉर्टर फायनलवर पावसाने पाणी फेरले. त्यामुळे नियमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
क्वॉर्टर फायनल रद्द झाल्यानंतर सर्वोत्कृष्ट क्रमवारीच्या आधारे भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश सेमिफायनलमध्ये पोहचले. महत्त्वाचे म्हणजे, एशियन गेम्स 2022 मध्ये भारताला सर्वोत्कृष्ट क्रमवारीच्या आधारेच सुवर्ण पदक प्राप्त झाले होते.
‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2022 च्या फायनलमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना अफगाणिस्तानशी होणार होता. दरम्यान पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे सर्वोत्कृष्ट क्रमवारीच्या आधारे भारतीय संघाला चॅम्पियन घोषित करण्यात आले होते. पण यंदा मात्र नियम बदलण्यात आले आहेत. यंदा जर फायनलमध्ये पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना सुवर्ण पदक दिले जातील.