दीपक चाहरच्या बॅट्स चोरीला (फोटो- ट्विटर)
दीपक चहरच्या किटमधून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन अत्यंत महागड्या ‘प्लेयर एडिशन’ बॅट चोरीला गेल्या आहेत. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत दीपक चाहरने सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Three player-edition bats belonging to cricketer Deepak Chahar have reportedly been stolen from the Chahar Academy Ground in Shastripuram, Agra. The three bats are worth around ₹1.5 lakh.@deepak_chahar9 shared a video informing fans about the incident. Requesting… pic.twitter.com/z5LR8XfX5p — Abhishek Arjun Singh (@AbhishekArjun05) September 29, 2026
Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुश फायनलमध्ये, तर नरेंद्रने कांस्य जिंकले
समोर आलेल्या माहितीनुसार, आग्रा येथे असणाऱ्या शास्त्रीपुरम येथे असणाऱ्या एका मैदानावर दीपक चहर सरावासाठी गेला होता. तेथे त्याने सरावासाठी ठेवलेल्या किटमधून अचानक तीन बॅट गायब झाल्या. या तिन्ही बॅट आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘प्लेयर एडिशन’ प्रकारातील असून त्यांची एकूण किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.
दीपक चहरने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूच्या बाबतीत त्याच्याच शहरात असा प्रकार घडत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. या प्रकरणी आग्रा पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॅट चोरीला गेल्यानंतर हताश झालेल्या दीपक चहरने इन्स्टाग्रामवर एक भावूक आणि संतापजनक व्हिडिओ पोस्ट केला होता. “या चोरीची तक्रार आग्रा पोलिसांकडे करू, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करू की थेट देवाकडे जाऊ?” असा सवाल त्याने या व्हिडिओत उपस्थित केला असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सामान्य नागरिकांनी स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.






