
Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल
पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेला हा सेमिफायनल सामना रोमहर्षक राहिला आणि सामन्यात अधिक वेळ भारतीय संघाने आपला दबदबा बनवला होता. सामन्याच्या अखेरीस पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण अखेरच्या मिनिटांत अभिषेकच्या गोलने पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवला.
भारत 3-0 असा आघाडीवर सहज विजयाच्या दिशेने आगेकूच करत होता, पण अखेरच्या क्वॉर्टरमध्ये पाकिस्तानने स्कोर बरोबरीवर आणला. त्यानंतर अखेरच्या क्षणी अभिषेकने गोल करत भारताची आघाडी वाढवत संघाला विजय मिळवून दिला.
भारताने आक्रमक सुरुवात केली व पाचव्या मिनिटाला पहिला गोल केला. अनेक पेनल्टी कॉर्नर प्राप्त केल्यानंतर हरमनप्रीत सिंगने पाकिस्तानचा गोलकीपत मुनीब उर रहमान रजाच्या पायांमधून गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हरमनप्रीतने 13 व्या मिनिटाला आणखीन एक पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून जबरदस्त गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. त्याआधी भारताने सामन्यात आपला दबदबा निर्माण केला होता.
Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…
सुरुवातीच्या क्वॉर्टरमध्ये पाकिस्तानला भारताच्या रणनीतिचा सामना करावा लागला, पण ब्रेकनंतर खेळ थोडा बदलला. सुखजीत सिंगने 23 व्या मिनिटाला स्कोर 3-0 असा नेला. हा गोल मनप्रीत सिंगचा चेंडू ताब्यात घेण्यापासून सुरू झाला, तर शिलानंद लाकरा डाव्या बाजुने पुढे आला व त्याने गोल करण्यास मदत केली.
हाफ टाइमच्या आधी पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. तेव्हा अबू अहमदने 30 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतरण करत अंतर 3-1 वर नेले. हाफ टाइमनंतरही खेळाचा प्रवाह बदलला. 45 व्या मिनिटाला हनान शाहिदने आणखीन एक गोल केला. अखेरच्या क्वॉर्टरच्या तिसऱ्या मिनिटाला पाकिस्तानने पुनरागमन केले. राणा वहीदने उजव्या बाजूने गोल करत सामना 3-3 असा समान गोल संख्येवर नेला. तीन गोलच्या आघाडीनंतर भारतावर शूट आउटचे वादळ घोंघावत होते. अभिषेकने काही सेकंदआधी चौथा गोल करत सामना भारताच्या खिशात घातला. फायनलमध्ये आता भारताचा सामना दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील दुसऱ्या सेमिफायनलमधील विजेत्या संघाशी होणार आहे.
Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास