Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण

Asian Games 2026 : भारतीय कुस्तीपटू सुजीत कलकलने अखेरच्या सामन्यात कजाकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. भारताचे हे एकूण 15 वे सुवर्ण पदक ठरले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 02, 2026 | 06:01 PM
Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण

Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण

Follow Us
Follow Us:
  • यंदाच्या एशियन गेम्समधील कुस्तीतील पहिले सुुवर्ण
  • अखेरच्या सामन्यात कलकलचे दमदार पुनरागमन
  • विश्वविजेत्या जपानी खेळाडूला चारली धुळ
भारतीय कुस्तीपटू सुजीत कलकलने शुक्रवारी नागोया सिटी इनाए स्पोर्ट्स सेंटरमध्ये झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये तजाकिस्तानच्या अब्दुलमजीद कुदियेवचा 10-9 असा पराभव करत एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मधील रेसलिंगमध्ये भारताच्या गोल्डच्या प्रतिक्षेला पूर्णविराम लावला. त्याने पुरुषांच्या फ्रिस्टाइल 65 किलो वजनी गटात शानदार पुनरागमन करताना विजय प्राप्त केले.

सामन्यात जास्त वेळ 23 वर्षीय भारतीय खेळाडू 2-9 असा पिछाडीवर होता, पण त्याने सामन्याच्या अखेरच्या क्षणाला सलग आठ गुण मिळवत जबरदस्त पुनरागमन केले व कुदियेवचा पराभव करत एशियन्स गेम्समध्ये भारताला यंदाच्या हंगामातील पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले.

कलकलची दमदार कामगिरी

कलकलचा हा विजय आइची-नागोयामधील त्याच्या शानदार कामगिरीचा निकाल आहे. त्याने फायनलपर्यंत पोहचण्याच्या मार्गात एक ऑलिम्पिक चॅम्पियन आणि इराण व जपानसारख्या बळकट प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. भारतीय रेसलरने अफगाणिस्तानच्या सैयद उमर झझईविरुद्ध आपला सामना सुरू केला व सुरुवातीला तो 0-3 असा पिछाडीवर पडला.
त्यानंतर कलकलने ‘पुश आउट’ आणि ‘शोल्डर थ्रो’ मधून प्वॉइंट प्राप्त करत सामन्याचा निकालच बदलला व 5-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आणखीन एक ‘थ्रो’ आणि ‘रोल’ने चार प्वॉइंट प्राप्त केले, ज्यामुळे तो 13-3 असा टेक्निक श्रेष्ठतेच्या आधारे जिंकत विजयाची नोंद करत क्वॉर्टर फायनलमध्ये पोहचला.
त्यानंतर त्याने इराणच्या अब्बास इब्राहिम देहसावदकोहीविरुद्ध शानदार कामगिरी केली व कोणताही गुण गमावल्याशिवाय टेक्विक श्रेष्ठतेच्या आधारे विजयी झाला.

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’

Sujeet Kalkal on the victory podium after winning GOLD medal (Wrestling) ♥️ #AichiNagoya2026 #AG2026withIAS pic.twitter.com/nHVyeEi4tT — India_AllSports (@India_AllSports) October 2, 2026

सेमिफायनलमध्ये मोठे आव्हान

सेमिफायनल सामन्यात त्याच्यासाठी खूप मोठे आव्हान होते, कारण जपानचा ऑलिम्पिक विजेता कोटारो कियोकाचा त्याला सामना करायचा होता. दरम्यान, कलकल पहिल्याच पीरियडच्या अखेरीस 0-2 असा पिछाडीवर पडला, पण दुसऱ्या पीरियडमध्ये त्याने पुनरागमन करताना तीन प्वॉइंट प्राप्त केले, कियोका फक्त एकच प्वॉइंट मिळवू शकता.

सामना 3-3 असा ड्रॉवर संपला, पण कलकलने निश्चित नियमांच्या आधारे विजय प्राप्त केले व फायनलमध्ये जागा पक्की केली. जिथे त्याचा सामना कुदियेवशी झाला. तजासिक्तानचा कुस्तीपटू एक वेळ 9-2 असा आघाडीवर होता, पण कलकलने पराभव पत्कारला नाही व अखेरच्या क्षणी शानदार विजयाला गवसणी घातली.

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

Web Title: Asian games 2026 wrestler sujit kalkal win gold medal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • asian games 2026
  • gold medal
  • Wrestler

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास
1

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’
2

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
3

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?
4

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.