Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wrestler Sexual Harassment Case : महिला कुस्तीपटूच्या लैंगिक छळप्रकरणी नव्या घडामोडी, बृजभूषण सिंहांचा कोर्टात जबाब दाखल

Wrestler Sexual Harassment Case : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांनी सेशन कोर्टात जबाब दाखल केला आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला चार महिला कुस्तीपटूंनी आव्हान दिले असून, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यासाठी न्यायालयाने तारखा निश्चित केल्या आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 20, 2026 | 03:19 PM
Wrestler Sexual Harassment Case : महिला कुस्तीपटूच्या लैंगिक छळप्रकरणी नव्या घडामोडी, बृजभूषण सिंहांचा कोर्टात जबाब दाखल

Wrestler Sexual Harassment Case : महिला कुस्तीपटूच्या लैंगिक छळप्रकरणी नव्या घडामोडी, बृजभूषण सिंहांचा कोर्टात जबाब दाखल

Follow Us
Follow Us:
  • न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पीडितांचे सेशन कोर्टात आव्हान
  • दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यासाठी तारीख निश्चित
  • तो निर्णय योग्य नसल्याचे कुस्तीपटूंचे मत
 

Wrestler Sexual Harassment Case : भारतीय कुस्ती संघा (WFI)चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी विनयभंग व लैंगिक छळाचे आरोप लावले होते. हे प्रकरण तेव्हा एवढे गजबजले की, कुस्तीपटूंनी थेट दिल्लीत आंदोलनाला सुरुवात करत बृजभूषण यांच्या पदाचा राजीनामा मागितला होता.
अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर केंद्रात खासदार असलेल्या बृजभूषण यांचा WFI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला व कोर्टात खटलाही दाखल झाला. पीडितांनी आपल्याकडील अनेक पुरावे कोर्टात सादर केले, पण काही महिन्यानंतर विविध गोष्टींचा दाखला देत सत्र न्यायालयाने महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी बृजभूषण यांची निर्दोष मुक्तता केली.
न्यायालयाच्या या निकालाला पीडित महिला कुस्तीपटूंनी या निकालाविरोधात एक अपिल दाखल केली आहे. त्यानुसार शुक्रवारी बृजभूषण सिंह यांनी एव्हेन्यू कोर्टाच्या सेशन कोर्टात आपला जबाब दाखल केला आहे.

बाजू ऐकण्यासाठी तारीख निश्चित

दरम्यान, न्यायालयाने अपीलकर्ता महिला कुस्तीपटूंची बाजू ऐकण्यासाठी 27 आणि 28 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. तसेच कोर्टाने बृजभूषम शरण सिंह यांची बाजू ऐकण्यासाठी त्यांना 5 आणि 9 डिसेंबर ही तारीख दिली आहे.
चार महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह आणि WFI चे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांना लैंगिक शोषणाप्रकरणी मॅजेस्ट्रिट कोर्टाने निर्दोष मुक्त केल्यानंतर या निकालाविरोधात सेशन कोर्टात त्याला आव्हान दिले आहे. तसेच तोमर यांच्यावर गुन्ह्यात्मक धमकी देण्याच्या आरोपातून मुक्त केल्याबाबतच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.

IND Vs NZ: बॅट नव्हे धारदार तलवारच जणू! KL Rahul ची किवींविरुद्ध शानदार खेळी; केला ‘हा’ वर्ल्डरेकॉर्ड

तो निर्णय योग्य नसल्याचे कुस्तीपटूंचे मत

अपिल करणाऱ्या कुस्तीपटू म्हणाल्या की, ट्रायल कोर्टाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणारे नाही आणि रेकॉर्डमध्ये सध्याचे योग्य पूराव्यांचे आकलनही नीट करण्यात आलेले नाही. 3 ऑगस्टला देण्यात आलेल्या निर्णयात एडिशनल चीफ ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट अश्विनी पंवार यांनी सिंह आणि तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांनी निकाल देताना हे सांगितले की, याचिकाकर्त्यांच्या वतीने त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप कोणत्याही योग्य कारणाशिवाय सिद्ध करण्यास अपयशी राहिला.

हे प्रकरण जानेवारी 2023 चं आहे, जेव्हा ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासमवेत अनेक कुस्तीपटू दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले होते. या कुस्तीपटूंनी यावेळी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाशिवाय धमकी देण्याचा आरोप लावला होता.

IND vs NZ: जैस्वालची वादळी खेळी अन् राहुलची संयमी साथ; भारताची ‘यशस्वी’ सुरुवात, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया १५० पार

त्यांनी सिंह यांच्या राजीनाम्यासह फेडरेशन संपवण्याची मागणी केली होती. या वादानंतर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए)च्या अध्यक्षा पीटी उषा यांनी एक तपास कमिटी बनवली. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने WFI च्या कामकाजाला निलंबित केले. मे 2024 मध्ये राउज एव्हेन्यू कोर्टाने सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि पाच महिला कुस्तीपटूंच्या सन्मानाला ठोस पोहचवण्यासंदर्भात आरोप निश्चित केले होते. तेव्हा सिंह यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितलेले आणि ट्रायलचा सामना करण्याचा निर्णय घेतलेला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणते आरोप करण्यात आले होते?

    Ans: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी विनयभंग, लैंगिक छळ आणि धमकी दिल्याचे आरोप केले होते.

  • Que: बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन कोणी केले होते?

    Ans: विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी जानेवारी 2023 मध्ये दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केले होते.

  • Que: न्यायालयाच्या निर्णयाला कोणी आव्हान दिले आहे?

    Ans: चार महिला कुस्तीपटूंनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात सेशन कोर्टात अपील दाखल केले आहे.

Web Title: Brij bhushan singh wrestler sexual harassment case appeal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • brijbhushan singh
  • Jantar Mantar
  • Wrestler

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.