Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय

Asian Games 2026 : एशियन गेम्समधील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ असा पराभव केला. या विजयासह भारत 'बी' गटात अव्वल स्थानी पोहचला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 21, 2026 | 02:19 PM
Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • भारतीय फॉरवर्ड खेळाडूंची दमदार कामगिरी
  • संपूर्ण सामन्यात भारताचा दबदबा
  • दीपिकाने फॉर्म कायम राखला
 
एशियन गेम्स (Asian Games) २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी कायम राहिली. पहिल्या सामन्यात उज्बेकिस्तानला 19-0 असे नमवल्यानंतर संघाने दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाचा 17-1 अशा फरकाने गेम केला.

या सामन्यात भारतीय संघातील फॉरवर्ड खेळाडूंनी इंडोनेशियाच्या डिफेन्स फळीचा धुव्वा उडवला. भारतीय संघ सामन्यात सुरुवातीपासूनच वरचढ राहिली. संघाने इंडोनेशियाच्या डिफेन्सवर सलग दबाव निर्माण केला आणि एका पाठोपाठ एक गोल केले. भारताच्या वतीने दीपिका, ऋतुजा पिसाळ आणि नवनीत कौरने शानदार कामगिरी करताना गोल करण्याची आपली हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच सुनिता टोप्पो, लालरेमसियामी आणि साक्षी राणानेदेखील प्रत्येकी दोन गोल करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधाल सलीमा टेटे आणि इशिकाने देखील प्रत्येकी एक गोल केले.

संपूर्ण सामन्यात भारताचा दबदबा

सुरुवाती दोन क्वार्टरमध्ये भारताचा दबदबा पाहण्यास मिळाला. पहिल्या हाफमध्येच भारताने 9-0 अशी आघाडी मिळवली होती. इंडोनेशियाच्या वतीने एकमेव गोल तिसऱ्या क्वार्टरमध्ये इन्नेस आदित्यने केला. या एकमेव गोलशिवाय इंडोनेशिया एकवेळही भारताच्या डिफेन्सला भेदू शकली नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने एकूण 4 गोल केले. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये संघाने आपल्या या कामगिरीदरम्यान आणखीन 5 गोल करत यश प्राप्त केले.

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

फॉर्मात आहे दीपिका

सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंडोनेशियाच्या वतीने करण्यात आलेल्या गोलला प्रत्युत्तर देताना भारताने तब्बल 5 गोल केले. तसेच चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आणखीन 3 गोल करत सामना 17-1 असा आपल्या नावे केला. या सामन्यात तीन गोल करणाऱ्या दीपिकाची कामगिरी उज्बेकिस्तानमधील सामन्याप्रमाणेच राहिली. तिने पहिल्या सामन्यात चक्क 8 गोल केले होते. तिने दोन्ही सामन्यात एकूण 11 गोल केले आहेत. या विजयासह भारतीय संघ बी गटात अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ येणाऱ्या सामन्यात आपली हिच लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित

Web Title: Asian games womens hockey team beat indonesia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Hockey
  • Indonesia

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य
1

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित
2

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित

Shafali Verma चा ‘धुमाकूळ’, ४९ चेंडूत तुफानी शतक अन् मोडले ७ रेकॉर्ड्स, मंधानाचाही विक्रम केला धुळीस
3

Shafali Verma चा ‘धुमाकूळ’, ४९ चेंडूत तुफानी शतक अन् मोडले ७ रेकॉर्ड्स, मंधानाचाही विक्रम केला धुळीस

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.