Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरीस भारत “या” स्थानावर, जाणून घ्या यंदा कशी होती भारतासाठी “कॉमनवेल्थ २०२२”?

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 09, 2022 | 10:17 AM
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरीस भारत “या” स्थानावर, जाणून घ्या यंदा कशी होती भारतासाठी “कॉमनवेल्थ २०२२”?
Follow Us
Close
Follow Us:

मागील अनेक दिवसांपासून क्रीडा प्रेमींमध्ये बहुचर्चित असलेली राष्ट्रकुल स्पर्धा इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये ८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. यंदाची राष्ट्रकुल क्रीडा २०२२ ही स्पर्धा भारतासाठी अत्यंत खास ठरली असून या स्पर्धेत भारताच्या नव्या आणि दिग्गज खेळाडूंनी दमदार कामगिरी करून भारतासाठी पदकांचा पाऊस पाडला. या स्पर्धेत भारताने २२ सुवर्णपदकं, १६ रौप्यपदकांसह २३ कांस्यपदकांची कमाई केली आहे. मात्र यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत शूटिंग या खेळाचा समावेश न झाल्याने भारताच्या पदकतालिकेवर मोठा फरक पडला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या म्हणजेच अकराव्या दिवशी भारत ६१ पदक जिंकून चौथ्या स्थानावर विराजमान झालेला आहे. तर पहिल्या स्थानावर सुरुवातीपासूनच राज्य करीत असलेला ऑस्ट्रेलिया १७८ पदक पटकावून प्रथम स्थानावरच ठाण मांडून आहे. ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ केवळ ३ पदकांच्या फरकाने १७५ पदक पटकावून इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. तर राष्ट्रकुल स्पर्धेत ९२ पदक पटकावून कॅनडा तिसऱ्या स्थानाचा दावेदार बनला आहे.

जागतिक स्तरावरील एक महत्त्वाची क्रीडा स्पर्धा म्हणून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे पहिले जाते. १९३० पासून पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताने मागील काही वर्षात अगदी चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. २०१० साली तर १०१ पदकांसह भारताने दुसरं स्थान पटकावले होते. यंदा ६१ पदक जिंकत भारत चौथ्या स्थानी राहिला. शूटींग स्पर्धा नसल्याने यंदा भारताने सर्वाधिक पदके कुस्तीमध्ये जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

यंदा सर्वाधिक पदकं कुस्तीत :
यंदा भारताने सर्वाधिक पदक ही कुस्ती खेळात जिंकली असून यामध्ये ६ सुवर्णपदकांसह १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. यात बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दहिया, नवीन यांच्यासह महिलांमध्ये विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक मिळवली आहेत. तर अंशू मलिकने रौप्यपदक मिळवले असून मोहित ग्रेवाल, दीपक नेहरा, पुजा गेहलोट, पुजा सिहाग आणि दिव्या काकरन यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

टलिफ्टिंगमध्येही भारताची चमकदार कामगिरी

भारताने यंदा कुस्तीनंतर सर्वाधिक पदकं ही वेटलिफ्टिंग खेळात मिळवली. भारताने ३ गोल्ड, ३ सिल्वर आणि ४ कांस्यपदकांसह एकूण १० पदकं वेटलिफ्टिंगमध्ये मिळवली. मीराबाई चानूने, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली यांनी सुवर्ण पदक पटकावले. याशिवाय संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, विकास ठाकूर यांनी रौप्य पदक मिळवले. तर गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह यांनी कांस्यपदक मिळवलं.

अॅथलेटिक्समध्ये भारताला ८ पदकं

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यंदा दुखापतीमुळे स्पर्धेला मुकल्याने भारताचं एक जवळपास निश्चित असणारं गोल्ड हुकलं. पण तरी अॅथलेटिक्समध्ये भारताने 8 पदकं जिंकली. यामध्ये एका सुवर्णपदकासह ४ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश होता. विशेष म्हणजे ट्रीपल जम्पमध्ये भारताने गोल्ड आणि सिल्वर दोन्ही मिळवले. तर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे आणि १० किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामी यांनी रौप्य पदकं मिळवली. तर १० किमी चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक संदीप कुमारने मिळवलं. याशिवाय हाय जम्पमध्ये एम श्रीशंकर, तेजस्वीन शंकर यांनी आणि भालाफेकमध्ये अन्नू राणी हिने कांस्य पदक जिंकले.

बॉक्सिंगमध्ये भारताला ७ पदकं

बॉक्सिंग स्पर्धेतही भारताने दमदार कामगिरी करत सात पदकांना गवसणी घातली. यामध्ये निखत झरीन, नितू घांघससह अमित पांघलने सुवर्णपदक तर सागर अहलवाटने रौप्य आणि रोहित टोकस, जॅस्मिन आणि मोहम्मद हुसामुद्दीन यांनी कांस्य पदक मिळवलं.

टेबल टेनिसमध्ये ४ सुवर्णपदकं

टेबल टेनिस आणि पॅरा टेबल टेनिसमध्ये मिळून भारताने तब्बल ७ सुवर्णपदकं, १ रौप्य आणि २ कांस्य पदकं जिंकली. यामध्ये शरथ कमल-श्रीजा जोडीने तसंच शरथने पुरुष एकेरीत आणि पुरुष संघाने गोल्ड मिळवलं. पॅरा टेबल टेनिसपटू भाविनानेही गोल्ड तर सोनलबेनने कांस्यपदक मिळवलं. तर शरथ आणि साथियान यांच्या जोडीने रौप्य आणि साथियान गनसेकरनने पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं.

बॅडमिंटनमध्येही भारत यशस्वी

बॅडमिंटनस्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांसह दोन कांस्य आणि एक रौप्यपदक जिंकत ६ पदकं मिळवली. यामध्ये पुरुष, महिला एकेरीत अनुक्रमे लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधूने तर सात्विक आणि चिराग जोडीने पुरुष दुहेरीत गोल्ड मिळवलं. तर बॅडमिंटन संघाने रौप्यपदकाला गवसणी घातली. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी महिला दुहेरीत आणि किदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं.

क्रिकेट-हॉकीमध्येही पदक

यंदा नव्याने सामिल करण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पुरुष हॉकी संघालाही कांगारुनीच मात दिल्यामुळे रौप्य पदक मिळाल. तर महिला हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.

लॉन बॉल्स हा अनेकांना अपरिचित असणाऱ्या खेळातही भारताने अप्रतिम कामगिरी करत महिला गटात गोल्ड तर पुरुष गटात सिल्वर मेडल मिळवलं. त्याशिवाय ज्युदोमध्ये सुशीला देवी आणि तुलिका मान यांनी रौप्य तर विजय कुमारनं कांस्य पदक जिंकलं. तसचं पॅरा वेटलिफ्टर सुधीरने सुवर्णपदक जिकलं. तसंच स्कॉश खेळात भारताच्या सौरव घोषालने कांस्य पदक आणि मिश्र फेरीत सौरवने दिपीकासह कांस्यपदक मिळवलं.

Web Title: At the end of the commonwealth games india at this place know how this year was commonwealth 2022 for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 10:17 AM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • india
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • navarshtra

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.