
फोटो सौजन्य - जिओहाॅटस्टार
Joe Root and Ben Stokes : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये चौथा सामना आज पार पडला. पहिल्या तीन इंग्लंडच्या सलग पराभवानंतर चौथ्या सामन्यामध्ये विजय हाती लागला आहे. अॅशेस कसोटी मालिकेतील चौथा सामना दुसऱ्याच दिवशी संपला आहे. मेलबर्नमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी एक संस्मरणीय कसोटी होती. जवळजवळ १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजांचा दबदबा दोन्ही संघाकडून पाहायला मिळाला.
अॅशेस मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला आणि मालिका गमावावी लागली. इंग्लंडवर जगभरातून टीका झाली, सातत्याने केलेल्या खराब कामगिरीमुळे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. म्हणूनच, इतक्या वर्षांनी जेव्हा इंग्लंडने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला तेव्हा बेन स्टोक्स आणि जो रूट यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या.
Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १५२ धावा केल्या, तर इंग्लंडने ११० धावा केल्या. आघाडी घेऊन मोठे लक्ष्य ठेवण्याच्या आशेने ऑस्ट्रेलियाला १३२ धावांत गुंडाळण्यात आले. १७५ धावांचे लक्ष्य समोर असलेल्या इंग्लंडने चार विकेट्स राखून यशस्वीरित्या पाठलाग केला. यासह, इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना जिंकला.
इंग्लंडने गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नव्हता. १५ वर्षे आणि १८ सामन्यांनंतर जेव्हा इंग्लिश संघाने अखेर पराभवाचा सिलसिला संपवला तेव्हा जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स भावुक झाले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि विजयाबद्दल एकमेकांचे अभिनंदन केले. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद स्पष्ट दिसत होता.
PURE EMOTIONS BY BROAD WHEN ENGLAND WON THE TEST AT MCG. ♥️ pic.twitter.com/4ogDY3pcBo — Johns. (@CricCrazyJohns) December 27, 2025
स्टुअर्ट ब्रॉडने वर्षानुवर्षे इंग्लंडसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली, परंतु तो ऑस्ट्रेलियन भूमीवर ऑस्ट्रेलियन संघाला हरवू शकला नाही. निवृत्तीनंतर, तो आता समालोचक म्हणून काम करतो आणि जेव्हा इंग्लंडने बॉक्सिंग डे कसोटी जिंकली तेव्हा तो भावनिक झाला आणि त्याच्या आवाजातून त्याच्या देशाच्या विजयाचा आनंद स्पष्टपणे दिसून आला.