
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या भारताची मालिका सुरु आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया टी20 मालिका खेळताना दिसणार आहे. २०२५-२६ अॅशेस २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेचा पहिला सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे दोन्ही संघ जिंकून मालिकेत लवकर आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी या अनुभवी खेळाडूची नियुक्ती केली आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला नव्हता. त्याच्या जागी मिशेल मार्शने संघाचे नेतृत्व केले. कमिन्स आता पहिल्या अॅशेस कसोटीतून बाहेर पडला आहे, जो पर्थ कसोटीदरम्यान स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. दुसरी कसोटी ४ डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे खेळली जाईल. या सामन्यापूर्वी पॅट कमिन्स तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून परतल्यानंतर कमिन्सला पाठदुखीचा त्रास झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “कमिन्स लवकरच गोलंदाजीमध्ये परततील.”
BREAKING: Pat Cummins has been ruled out of the first Ashes Test in Perth due to his back injury; Steve Smith will lead Australia in his absence Full story: https://t.co/gS99KzBnJO pic.twitter.com/gBqArvdLRx — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 26, 2025
कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही, त्यामुळे स्कॉट बोलँड संघात असू शकतो. ऑस्ट्रेलिया लवकरच पहिल्या सामन्यासाठी त्यांचा संघ जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. बोलँडने भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रभावी कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे, पर्थ कसोटीत तो मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्यासोबत खेळू शकतो. नॅथन लायन मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून खेळेल हे निश्चित दिसते. कर्णधार म्हणून स्मिथचे पुनरागमन देखील एक महत्त्वाचा बदल असू शकतो.