फोटो सौजन्य - X
ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये सध्या टी ट्वेंटी मालिका सुरू झाली. या मालिकेचा काल पहिला सामना पार पडला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी, म्हणजे १० ऑगस्ट रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान संघाने १७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यातील आकर्षणाचे केंद्रबिंदू टिम डेव्हिड होते, ज्याने शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयाकडे नेले. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलच्या आश्चर्यकारक झेलनेही ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करताना, कांगारुंनी टिम डेव्हिडच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पाहुणा संघ फक्त १६१ धावा करू शकला. ग्लेन मॅक्सवेलचा हा झेल दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या शेवटच्या षटकात आला जेव्हा रायन रिकेल्टन ७१ धावांवर शानदार फलंदाजी करत होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रायन रिकेल्टनने लाँग ऑनवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे उभ्या असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने हे होऊ दिले नाही.
मॅक्सवेलने प्रथम हवेत उडी मारून सीमा ओलांडून जाणारा चेंडू पकडला आणि नंतर तो सीमारेषेच्या आत ढकलला. त्यानंतर मॅक्सवेल सीमारेषेच्या बाहेर पडला आणि नंतर परत आत आला आणि त्याने चेंडू पकडला. हा झेल वाचायला आणि ऐकायला थोडा सोपा वाटेल, पण व्हिडिओ पाहून तुम्हाला हे झेल किती कठीण होते हे समजेल. व्हिडिओ पहा-
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कांगारूंनी त्यांचे टॉप-३ फलंदाज, ज्यात मार्श, ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंगलिस यांचा समावेश होता, १९ चेंडूत ३० धावांवर गमावले. त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिड यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.
GLENN MAXWELL DOES IT AGAIN 🤩 #AUSvSA pic.twitter.com/FQkfbqLzpB
— cricket.com.au (@cricketcomau) August 10, 2025
ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा डगमगला आणि त्यांचा अर्धा संघ ७५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेला, त्यानंतर टिम डेव्हिडने ५२ चेंडूत ८३ धावांची शानदार खेळी केली आणि संघाला १७८ धावांच्या विजयी धावसंख्येपर्यंत पोहोचवले. १९ वर्षीय क्वेना म्फाकाने या काळात ४ बळी घेतले. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १६१ धावा करता आल्या. सलामीवीर रायन रिकेलटनने ७१ धावांची खेळी केली, परंतु इतर फलंदाजांकडून मिळालेल्या पाठिंब्याअभावी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.