फोटो सौजन्य - X
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सध्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिला सामन्यांमध्ये सांगायला विजय मिळवून यामध्ये १–० अशी आघाडी घेतली होती. आज या मालिकेचा दुसऱ्या सामना पार पडला. सामन्यादरम्यान पाऊस पडल्यामुळे ३७ ओवरचा खेळ खेळण्यात आला. या दुसऱ्या सामनात वेस्टइंडीज च्या संघाने सामना जिंकून मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी केली आहे. सर्वांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
वेस्टइंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्या बद्दल सांगायचे झाले तर, वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा घेतला होता. पाकिस्तानच्या संघाने 37 ओवर मध्ये सात विकेट्स गमावून 171 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य वेस्टइडीजच्या 34 ओव्हर मध्ये पार केले. पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करत सेम आयुब आणि अब्दुल्ला शाफिकें या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. सेम आयुब याने संघाला २३ धावा करून दिल्या तर अब्दुल्ला शाफिकें याने २६ धावा केल्या. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम स्वस्तात बाद झाला त्याने एकही धाव केली नाही.
मुलापासून मुलगी झालेल्या अनया बांगरने साजरे केले रक्षाबंधन! शेअर केल्या मनातील भावना
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान हा देखील चांगली कामगिरी करू शकला नाही त्याने 16 धावा करून विकेट गमावली. वेस्टइंडीजची कामगिरीबद्दल सांगायचं झालं तर संघाची सुरुवात फारच वाईट झाली संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज स्वस्तात बाद झाले. वेस्टइंडीजचा कर्णधार शाई होप याने चांगले कामगिरी केली आणि टिकून राहिला. त्याने संघासाठी 32 धावा केल्या, तर शेरफण रदरफर्ड आणि रोस्टन चेस यांच्या खेळी निर्णायक ठरल्या.
पाकिस्तानच्या डावाच्या नवव्या षटकात बाबर आझम जॅडेन सील्सने क्लीन बोल्ड केलं. सील्सने षटकातील शेवटचा चेंडू पूर्ण टाकला आणि चेंडू उशिरा स्विंग झाला, ज्यामुळे पाकिस्तानी फलंदाजाला फसवले गेले आणि तो बोल्ड झाला. बाबर आझमने फक्त तीन चेंडूंचा सामना केला. बाद झाल्यानंतर तो खूप निराश दिसत होता. त्याच वेळी, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. ३१ एकदिवसीय डावांनंतर बाबर आझम पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. बाबरने एकही धाव न काढल्याने चाहते खूप नाराज झाले आणि त्याच्या फलंदाजीचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबरचा विक्रम उत्तम आहे, त्याने ५५ च्या सरासरीने ६२८२ धावा केल्या आहेत, बाबरने १९ शतकेही केली आहेत. माजी कर्णधार बाबर आझमला गेल्या दोन वर्षांपासून शतक करता आलेले नाही. त्याने २०२३ च्या आशिया कपमध्ये नेपाळविरुद्ध शेवटचे शतक केले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने चांगली खेळी केली आणि ४७ धावा करून फॉर्ममध्ये परतण्याची झलक दाखवली.
A brilliant win to level the series!💥#WIvPAK | #FullAhEnergy pic.twitter.com/v1XuANVwvy
— Windies Cricket (@windiescricket) August 10, 2025
पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने सात चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्सने पराभव केला. यासह, पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकांत सर्व विकेट्स गमावून २८० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४८.५ षटकांत पाच विकेट्स गमावून २८४ धावा केल्या आणि विजय नोंदवला. यापूर्वी पाकिस्तानने फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेली टी-२० मालिका २-१ ने जिंकली होती.