फोटो सौजन्य : X
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे लाईव्ह स्ट्रिंमिंग : पॅट कमिन्स आणि टेंबा बावुमा हे दोघे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिकेला इतिहास रचण्याची संधी आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांचे टायटल डिफेंड करण्याची संधी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा गुणतालिकेमध्ये भारताचा संघ हा तिसऱ्या स्थानावर राहिला त्यामुळे एक स्थानामुळे भारताचा संघ फायनल सामना खेळणार अपयशी ठरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरू व्हायला फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मागील काही मालिकांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्यामुळे दोन मजबूत एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. जगभरामधील क्रिकेट चाहते हे वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. डब्लूटीसी फायनलचा हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना कधी प्रक्षेपित होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा फायनलचा सामना हा 11 जून 2025 रोजी सुरू होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे या सामन्याच्या अर्ध्या तासा आधी नाणेफेक होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार सामना हा लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल चा सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघ:
टोनी डी झॉर्झी, रायन रिकेल्टन, एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, केशव महाराज, सेन.
ऑस्ट्रेलिया संघ :
उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टाझा, मारिनस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मॅट कुह्नेमन.