Death of 23-year-old Australian player
Australian Cricket in Mourning by Accidental Death : सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. यामध्ये भारताने पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हे सर्व सुरू असतानाच ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून दुःखद बातमी समोर आली आहे. एका 23 वर्षीय नवतरुण खेळाडूच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर शोककळा पसरली आहे. या खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंसोबत मॅचेस खेळल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर शोककळा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला गेला, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करीत पहिला सामना 295 धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्याला अजून बराच वेळ बाकी आहे. ॲडलेड कसोटीसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, या मालिकेदरम्यान संपूर्ण ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली आहे. कारण एका युवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा अपघाती मृत्यू झाला आहे. या खेळाडूच्या मृत्यूने ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर शोककळा पसरली आहे.
अनेक दिग्गजांसोबत केलीये पार्टनरशिप
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांसोबत खेळलेल्या 23 वर्षांच्या क्रिकेटरचा मृत्यू झाला आहे. ॲडी डेव्हच्या मृत्यूनंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेट हादरला आहे. कारण या खेळाडूचा मृत्यू कसा झाला यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू
डार्विन क्रिकेट क्लबने सोशल मीडियावर पोस्ट करत ॲडी डेव्हच्या मृत्यूची माहिती दिली. तो एक अष्टपैलू खेळाडू होता आणि डाव्या हाताच्या फिरकीसाठी प्रसिद्ध होता. ॲडी डेव्ह हा वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने 2017 मध्ये डार्विनमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या संघादरम्यान एक सामना खेळला गेला. ज्यामध्ये त्याला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली होती.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे सर्व चाहते दुःखी
27 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे सर्व चाहते दुःखी आहेत, कारण या दिवशी फिल ह्यूजचे निधन झाले होते. प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान त्याच्या डोक्याला चेंडू लागला आणि 27 नोव्हेंबर 2014 रोजी त्याचा मृत्यू झाला. बाऊन्सर असलेल्या शॉन ॲबॉटचा चेंडू सोडत असताना तो चेंडू फिल ह्युजेसच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला, त्यानंतर तो कोमात गेला. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या खेळाडूला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणार होते पण त्याआधीच हा अपघात झाला. आता या तारखेच्या एक दिवस आधी, आणखी एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हे जग सोडून गेला.
ॲडलेडमध्ये सुरू होणार दुसरा कसोटी सामना
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना काल संपला आणि भारताच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये कमालीचा कमबॅक केला आहे. भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीत पराभूत केले आहे. भारताच्या संघाने कॅप्टन रोहित शर्माच्या अनुपस्थित जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
रोहित शर्मासुद्धा होणार सहभागी
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, पितृत्व रजा संपल्यानंतर पर्थला पोहोचला आहे, त्यानंतर लगेचच तो सरावासाठी ताबडतोब नेटवर पोहोचला, तर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. काही दिवसांपूर्वी मुलाच्या जन्मानंतर, रोहित शर्मा रविवारी संध्याकाळी पर्थला पोहोचला आणि ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताच्या सर्वात मोठ्या कसोटी विजयाचा साक्षीदार होण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होता.