Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy आधी ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं, हे पाच खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

स्टोइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. चॅम्पियन ट्रॉफीला फक्त १४ दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 06, 2025 | 03:01 PM
फोटो सौजन्य - Australia Cricket सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Australia Cricket सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. आज ऑस्ट्रेलियाच्या संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस याने निवृत्तीची घोषणा केली आहे. आता आणखी मोठा धक्का ऑस्ट्रेलिया संघाला लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघामधील ५ खेळाडू संघाबाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघातील ५ खेळाडूंनी संघाचा ताण खूप वाढवला आहे.

IND vs ENG : इंग्लंड एकदिवसीय मालिकेत 40 वर्षांचा दुष्काळ संपवायचा का? वाचा सविस्तर

कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल मार्श, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, कॅमेरॉन ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. मार्कस स्टोइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. चॅम्पियन ट्रॉफीला फक्त १४ दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

– Pat Cummins ruled out.
– Josh Hazelwood ruled out.
– Mitchell Marsh ruled out.
– Cameron Green ruled out.
– Marcus Stoinis retired.
AUSTRALIA IN BIG BIG TROUBLE FOR CHAMPIONS TROPHY 2025…!!! pic.twitter.com/Yu4MCMLMCg — Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2025

ऑस्ट्रेलियाला करावे लागणार ५ बदल

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळल्याची अधिकृत घोषणा केली आहे. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियासोबत खेळलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जखमी झाले होते. ज्यामुळे हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नाहीत. कमिन्स घोट्याच्या दुखापतीशी झुंजत असताना, हेझलवूड अद्याप त्याच्या पायाच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या पाच खेळाडूंऐवजी ऑस्ट्रेलियन संघात कोणाला संधी मिळते हे पाहणे बाकी आहे.

Australia will need to make four changes to their preliminary squad for the upcoming #ChampionsTrophy with confirmation skipper Pat Cummins and fellow fast bowler Josh Hazlewood have been ruled out of the tournamenthttps://t.co/zYgCBUQb0v — cricket.com.au (@cricketcomau) February 6, 2025

ऑस्ट्रेलिया संघ निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले की, दुर्दैवाने पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल मार्श दुखापतींनी ग्रस्त आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वेळेवर पोहोचू शकणार नाहीत. “हे निराशाजनक असले तरी, जागतिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी इतर खेळाडूंना ही एक उत्तम संधी देईल.”

दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १३ दिवस आधी, मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. स्टोइनिस म्हणाला की त्याला टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि ही त्याच्यासाठी योग्य वेळ आहे. स्टोइनिसने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

Web Title: Australias tension increased before the champions trophy five players out of the team due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • cricket
  • Mitchell Marsh
  • Team Australia

संबंधित बातम्या

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन
1

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral
2

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे
3

WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे

AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटी विजयानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट झाले भावूक! सामन्यानंतर मारली मिठी
4

AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटी विजयानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट झाले भावूक! सामन्यानंतर मारली मिठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.