फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
अक्षर पटेल हॅट्रिक कॅच : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये काल दमदार सामना पाहायला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने दमदार खेळ दाखवत चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजयाने सुरुवात केली आहे. गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशला २१ चेंडू शिल्लक असताना सहा विकेट्सने पराभूत केले. या विजयासह, भारतीय संघ अ गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. शुभमन गिलने शतक झळकावले तर मोहम्मद शामीने पाच विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणाने सुद्धा त्यांच्या पहिल्या आयसीसी स्पर्धेमध्ये त्याने कमालीची सुरुवात केली आहे. तर सामन्यात टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने मैदानावर त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवली.
पण याचदरम्यान बांगलादेशच्या डावात अक्षर पटेलला हॅट्रिक घेण्याची सुवर्णसंधी होती पण रोहितच्या चुकीमुळे अक्षरचे हॅट्रिक घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. कॅच चुकवल्यानंतर रोहित स्वतःवर खूप रागावलेला दिसत होता आणि जमिनीवर हात आपटताना दिसला. त्याचबरोबर रोहित शर्माने अक्षरची हात जोडून माफी मागितली. बांगलादेशचा डाव संपल्यानंतर अक्षर पटेलने हॅट्रिक पूर्ण न केल्याबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अक्षर पटेलने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर तन्जीद हसन आणि मुशफिकुर रहीम यांना बाद केले. जाखर अली हॅटट्रिक चेंडूचा सामना करत होता पण तो नीट खेळू शकला नाही आणि चेंडू बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे गेला . रोहितसाठी हा एक सोपा झेल होता पण घाईमुळे चेंडू त्याच्या हातातून निसटला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहितला फटकारले.
या घटनेवर अक्षर पटेलने सांगितले की, “बऱ्याच गोष्टी घडतात,” अक्षर पटेल पहिला डाव संपल्यानंतर म्हणाला. मला माहित नव्हते की ते बाहेर आहे. पण केएलने अपील केले आणि तो बाद झाला. मग मला दुसरी विकेट मिळाली. तिसरे म्हणजे, जेव्हा चेंडू काठावर लागला तेव्हा मला वाटले की मी हॅटट्रिक घेतली आहे. या षटकात खूप काही घडले. मी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आणि मग मी पाहिले (रोहितने कॅच सोडला). मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि परत गेलो. हा खेळाचा एक भाग आहे.”
Catch #AxarPatel as he reflects on his game-changing over and the What he felt in the moment! 🏏🔥
📺📱 Start watching FREE on JioHotstar: https://t.co/dWSIZFgk0E#ChampionsTrophyOnJioStar 👉 #INDvBAN, LIVE NOW on Star Sports 1 & Star Sports 1 Hindi! pic.twitter.com/5JY55tO3eq
— Star Sports (@StarSportsIndia) February 20, 2025