IND vs BAN Match : प्रिन्स शुभमन गिलची शानदार शतकी खेळी; टीम इंडियाची विजयी सलामी; 6 विकेट राखून मिळवला विजय
Champions Trophy 2025 India vs Bangladesh Match : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशने गोलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजीचा निर्णय बांगलादेशला चांगलाच महागात पडला अवघ्या 228 धावांवर बांगलादेशचा संघ गारद झाला. सुरुवात डळमळीत झाली परंतु बांगलादेशकडून तोहिद ऱ्हिदोय आणि जाकर अलीने चांगली भागीदारी करीत संघाला 228 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. 229 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात करीत विजयाचा पाया रचला. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. तसेच शुभमन गिलने संयमी खेळी दाखवत शानदार शतक ठोकले. उपकर्णधार शुभमन गिलच्या शानदार शतकाने भारताला विजयापर्यंत नेले. त्याला केएल राहुलने चांगली साथ दिली.
शुभमन गिलची शतकी खेळी
Sensational Shubman in prolific form! 🔥
Back to Back ODI HUNDREDS for the #TeamIndia vice-captain! 🫡🫡
Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/gUW8yI8zXx
— BCCI (@BCCI) February 20, 2025
शुभमन गिलची शानदार खेळी
Classy and consistent as ever! ✨
1⃣6⃣th ODI FIFTY for Shubman Gill 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/4nvl8Bw90H
— BCCI (@BCCI) February 20, 2025
भारताची फलंदाजी
कर्णधार रोहित शर्माने डावाची धमाकेदार सुरुवात करीत 36 चेंडूत वेगवान 41 धावा केल्या. त्यानंतर किंग कोहलीकडून विशेष अपेक्षा असताना विराट कोहली 22 धावांवर रिशाद होसेनच्या चेंडूवर बाद झाला. श्रेयस अय्यरने 17 चेंडूत 15 धावा केल्या तर अक्षर पटेलने 12 चेंडूत 8 धावा केल्या. शुभमन गिलने शानदार संयमी खेळी करीत भारताला विजयापर्यंत नेले. केएल राहुलने त्याला चांगली साथ दिली.
शुभमन गिलचा शानदार षटकार
9️⃣8️⃣metres 😲
A breathtaking six from Shubman Gill.
Watch LIVE on @StarSportsIndia in India.
Here's how to watch LIVE wherever you are 👉 https://t.co/AIBA0YZyiZ pic.twitter.com/LgIK5AjixQ
— ICC (@ICC) February 20, 2025
बांगलादेशची डळमळीत सुरुवात
आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश सामना सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, त्यांचा हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशची गाडी घसरल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशची सुरुवात अत्यंत डळमळीत झाली. सलामीवीर तान्झीद हसन आणि सोमय्य सरकार यांची जोडी लकरच फुटली. सलामीवीर सोमया सरकार हा शून्यावरच बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोला हर्षित राणाने कोहलीद्वारा झेलबाद करीत अवघ्या (0) शून्यावर तंबूत पाठवले.
मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी, 200 बळींचा टप्पा केला पार
बांगलादेशची फलंदाजी
बांगलादेशच्या पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर सुरुवात खूपच डळमळीत झाली. मेंहदी हसन मिर्झासुद्धा आज विशेष चमत्कार दाखवू शकला नाही. त्याने अवघ्या 5 धावा केल्या. परंतु, तोहिक ऱ्हिदोयने खेळपट्टीवर मजबूत उभे राहून संघासाठी शतकी खेळी केली. त्याला जाकर अलीने तेवढीच चांगली साथ दिली. जाकर अलीने 114 चेंडूत 68 धावा केल्या. रिषाद हुसेन, तान्झीम हसन साकीब, तस्कीन अहमद पूर्णपणे फ्लॉप ठरले. बांगलादेशकडून तौहीद ऱ्हिदोय आणि जाकर अलीने शानदार खेळी करीत बांगलादेशला एक सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेले. परंतु बांगलादेशचा डाव 228 धावांवर संपुष्टात आला. भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य दिले.
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे सोपे
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे असते. आतापर्यंत येथे ५८ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ३४ वेळा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त २२ सामने जिंकता आले आहेत. दुबईमध्ये संध्याकाळी भरपूर दव पडतो पण गेल्या काही दिवसांत दव पडलेला नाही. हा सामना नवीन खेळपट्टीवर खेळला जात आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
बांगलादेशने स्वतःच्या पायवर पाडला धोंडा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशचा सामना करीत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. जरी या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानकडे असले तरी BCCI ने तिथे संघ पाठवण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये होत आहेत. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध प्रथम गोलंदाजी करीत आहे. नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय बांगलादेशला चांगलाच महागात पडल्याचे दिसून आले. बांगलादेशने त्यांच्यात पायावर धोंडा पाडल्याचे दिसून आले.