
पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं! (Photo Credit- X)
काय म्हणाला कर्णधार आयुष म्हात्रे?
अंतिम सामन्यातील कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना आयुष म्हणाला, “नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच होता, मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. हा आमच्यासाठी एक खराब दिवस होता.” “आमच्या गोलंदाजांच्या लाईन आणि लेंथमध्ये काही त्रुटी होत्या. क्षेत्ररक्षणातही आमचा दिवस आज चांगला नव्हता, खेळाकडून अशा चुका होतात.” “आमचा प्लॅन साधा होता, ५० षटकांपर्यंत फलंदाजी करायची. पण ते आम्हाला जमले नाही. तरीही संपूर्ण स्पर्धेत मुलांनी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. या स्पर्धेतून आम्ही अनेक सकारात्मक गोष्टी शिकलो आहोत.”
म्हात्रेचा स्वतःचा संघर्ष
या स्पर्धेत सलामीवीर आणि कर्णधार म्हणून आयुष म्हात्रेची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली. अंतिम सामन्यात तो केवळ २ धावा काढून बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत पाच सामने खेळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही, ज्यामुळे भारतीय डावाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. (हे देखील वाचा: IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ)
आता लक्ष्य अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ वर!
आशिया कपमधील हा कटू पराभव विसरून भारतीय संघ आता आगामी अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ ते ७ जानेवारी दरम्यान मालिका खेळणार आहे. १५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेतच अंडर-१९ वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंना आता आपल्या फलंदाजीतील जादू दाखवून भारताला पुन्हा एकदा विश्वविजेते बनवण्याचे आव्हान पेलवे लागणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाने फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत 26.2 षटकात 156 धावा करु शकला.
भारतीय संघाची खराब फलंदाजी
त्यानंतर, प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताच्या संघाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. वैभव सूर्यवंशी 26 धावांवर बाद झाला. कर्णधार आयुष म्हात्रे फक्त दोन धावा करू शकला. आरोन जॉर्जने 16 धावा केल्या. विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू देखील अपयशी ठरले, ज्यामुळे भारताचा डाव फक्त 156 धावांवर संपला आणि 191 धावांनी पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानकडून अली रझा यांनी चार, तर मोहम्मद सय्यम आणि हुजैफा एहसान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अब्दुल सुभान यांनीही दोन विकेट घेतल्या. यासह, पाकिस्तान १९ वर्षांखालील संघाच्या पातळीवर आशियाई विजेता बनला.